सुवर्णसंधी! iQOO 3 20,000 रुपयांनी स्वस्त; इथून विकत घ्या हा 12GB रॅम, 48MP कॅमेरा असलेला 5G फोन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2021 06:07 PM2021-06-23T18:07:17+5:302021-06-23T18:08:02+5:30
iQOO 3 Price: iQOO 3 5G चे सर्व व्हेरिएंटची किंमत कंपनीने अधिकृत वेबसाईटवर कमी केली आहे.
iQOO ने भारतात iQOO 3 च्या किंमतीत 50 टक्क्यांहून अधिक कपात केली आहे. हा स्मार्टफोन 37,990 रुपयांमध्ये लाँच करण्यात आला होता, परंतु आता हा फोन कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर 17,495 रुपयांमध्ये लिस्ट करण्यात आला आहे. कंपनी या फ्लॅगशिप फोनच्या सर्व व्हेरिएंटवर 20,000 रुपयांपेक्षा जास्त सूट देत आहे.
iQOO 3 च्या 5G व्हेरिएंटची नवीन किंमत
iQOO 3 5G चे सर्व व्हेरिएंटची किंमत कंपनीने अधिकृत वेबसाईटवर कमी केली आहे. iQOO 3 5G चा 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज मॉडेल 17,495 रुपये, 8 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंट 18,995 रुपये आणि 12 जीबी की रॅम + 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंट 22,495 रुपयांमध्ये विकत घेता येईल. यांची किंमत अनुक्रमे 37,990 रुपये, 41,990 रुपये आणि 46,990 रुपये होती. हे फोन्स फ्लिपकार्टवर देखील उपब्लध आहेत, परंतु अजूनतरी हि नवीन किंमत फ्लिपकार्टवर लिस्ट झाली नाही.
iQOO 3 चे स्पेसिफिकेशन्स
आयक्यू 3 मध्ये 2400 × 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 6.44 इंचाचा फुलएचडी+ सुपर अॅमोलेड डिस्प्ले मिळतो. हा डिस्प्ले एचडीआर 10+ तसेच 1200+ निट्स ब्राइटनेसला सपोर्ट करतो. iQOO 3 मध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनमध्ये 48 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा, 13 मेगापिक्सलची 20X डिजीटल झूम टेलीफोटो लेन्स, 13 मेगापिक्सलची वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची बोकेह लेन्स आहे. आयक्यू 3 मध्ये 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. सिक्युरिटीसाठी या स्मार्टफोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो.
iQOO 3 मध्ये अँड्रॉइड 10 आधारित आयक्यू युआय 1.0 देण्यात आला आहे. तसेच, प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये क्वॉलकॉमचा फ्लॅगशिप स्नॅपड्रॅगन 865 चिपसेट देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी iQOO 3 मध्ये एड्रेनो 650 जीपीयूला मिळतो. त्याचबरोबर फोनमध्ये 4,440 एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे, ही बॅटरी 55वॉट सुपर फ्लॅशचार्ज टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते.