iQOO 8 Pro स्मार्टफोनमध्ये मिळणार भन्नाट गिम्बल कॅमेरा; 17 ऑगस्टला होणार सादर
By सिद्धेश जाधव | Published: August 11, 2021 06:56 PM2021-08-11T18:56:32+5:302021-08-11T19:01:55+5:30
iQOO 8 Pro Camera Setup: iQOO 8 Pro कॅमेरा सेटअपमध्ये 50 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर देण्यात येईल. सोबत एक 48 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड सेन्सर आणि 16 मेगापिक्सलचा तिसरा सेन्सर मिळेल.
iQOO ची आगामी फ्लॅगशिप स्मार्टफोन सीरिज 17 ऑगस्टला लाँच करण्यात येणार आहे. या सीरीजमधील iQOO 8 Pro स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याचा एक पोस्टर कंपनीने सोशल मीडियावर शेयर केला आहे. या पोस्टरमधून या स्मार्टफोनच्या कॅमेरा सेटअपची माहिती मिळाली आहे. iQOO 8 Pro स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह सादर केला जाईल. या सेटअपमधील मुख्य कॅमेरा 50 मेगापिक्सलचा आहे.
iQOO 8 Pro स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असेल, हे कंपनीने शेयर केलेल्या पोस्टरमधून समजले आहे. हा कॅमेरा सेटअप VIS 5-अॅक्सेस अँटी शेक मायक्रो क्लाऊड गिंबल स्टेबलाइजाइजेशन सपोर्टसह सादर केला जाईल. ही विवोची टेक्नॉलॉजी आहे आणि ही याआधी विवोच्या स्मार्टफोन्समध्ये दिसली आहे. यामुळे व्हिडीओ काढताना स्मार्टफोन डगमगला तरीही व्हिडीओ स्थिर रेकॉर्ड केले जातात. तसेच iQOO 8 Pro कॅमेरा सेटअपमध्ये 50 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर देण्यात येईल. सोबत एक 48 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड सेन्सर आणि 16 मेगापिक्सलचा तिसरा सेन्सर मिळेल, ज्याची फोकल लेंथ 14mm-60mm आहे.
iQOO 8 स्पेसिफिकेशन्स
iQOO 8 Pro स्मार्टफोन क्वालकॉमच्या पावरफुल Snapdragon 888+ चिपसेटसह सादर केला जाईल. तसेच iQOO 8 स्मार्टफोनमध्ये Snapdragon 870 किंवा Snapdragon 888 चिपसेट मिळू शकतो. iQOO 8 Pro स्मार्टफोनमध्ये 12GB पर्यंतचा रॅम मिळेल जो रॅम एक्सटेंशन फीचरच्या मदतीने 4GB पर्यंत वाढवता येईल.
कंपनीने सांगितले आहे कि, आगामी iQOO 8 स्मार्टफोनमध्ये 2K रिजोल्यूशन असलेला डिस्प्ले देण्यात येईल. हा एका E5 AMOLED LTPO 10bit डिस्प्ले पॅनल असेल. हा डिस्प्ले 1Hz ते 120Hz रिफ्रेश रेटमध्ये अॅडजस्ट होणाऱ्या डायनॅमिक रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. या स्मार्टफोनमध्ये वेगवान Snapdragon 888 Plus SoC देण्यात येईल. या नव्या स्नॅपड्रॅगन चिपसेटसह येणारा हा जगातील पहिला स्मार्टफोन असेल. या फोनमध्ये 120W चार्जिंग टेक्नॉलॉजी देण्यात येईल.