सर्वात शक्तिशाली Snapdragon 888+ चिपसेटसह येऊ शकते iQOO 8 सीरीज; मिळणार दमदार फीचर्स
By सिद्धेश जाधव | Published: July 21, 2021 11:54 AM2021-07-21T11:54:51+5:302021-07-21T11:55:47+5:30
iQOO 8 with Snapdragon 888 Plus: आयक्यूने आधीच सांगितले आहे कि आयक्यू 8 सीरीज मधील स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 888 प्लस चिपसेट दिला जाईल.
काही दिवसांपूर्वी बातमी आली होती कि चिनी ब्रँड आयक्यू येत्या 4 ऑगस्ट रोजी आपली नवीन स्मार्टफोन सीरीज iQOO 8 सादर करणार आहे. या सीरीजमध्ये iQOO 8 आणि iQOO 8 Plus स्मार्टफोन लाँच होतील, अशी चर्चा आहे. आता एका लीकमध्ये iQOO 8 चे स्पेसिफिकेशन्स शेयर करण्यात आले आहेत. लीकनुसार, iQOO 8 सीरीज Qualcomm Snapdragon 888+ चिपसेटसह येणारी सर्वात पहिली सीरिज असेल. तसेच या सीरिजमधील स्मार्टफोन्समध्ये 2K डिस्प्ले, 120W फास्ट चार्जिेग आणि 12GB रॅम + 4GB वर्च्युल रॅम असे दमदार स्पेसिफिकेशन्स मिळू शकतात.
क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 888 प्लस चिपसेट हा स्नॅपड्रॅगन 888 चिपसेटचा अपग्रेड व्हर्जन आहे. हा चिपसेट आधीच्या तुलनेत 20 टक्के जास्त चांगली कामगिरी करतो. आयक्यूने आधीच सांगितले आहे कि आयक्यू 8 सीरीज मधील स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 888 प्लस चिपसेट दिला जाईल. हा चिपसेट 2.995गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीडसह येतो.
iQOO 8 सीरिजचे स्पेसिफिकेशन्स
प्रसिद्ध लिक्सटर डिजीटल चॅट स्टेशनने iQOO 8 सीरिजचे स्पेसिफिकेशन्स लीक केले आहेत. लीकनुसार, iQOO 8 सीरीजच्या स्मार्टफोनमध्ये 12 जीबी रॅमसोबत 4 जीबी एक्सटेंडेड (वर्च्युल) रॅम देण्यात येईल. म्हणजे गरज पडल्यास तुम्ही फोनमधील रॅम 16 जीबीपर्यंत वाढवू शकता. iQOO 8 सीरीज स्मार्टफोनमध्ये 3200 x 1440 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 2K डिस्प्ले दिला जाऊ शकतो. हा डिस्प्ले 120हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. या सीरिजमध्ये 4,000एमएएचची बॅटरी मिळू शकते, परंतु यासोबत मिळणारी 120W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी या सीरिजची खासियत म्हणता येईल.