आतापर्यंतचा शक्तिशाली अँड्रॉइड स्मार्टफोन iQOO 8 लवकरच होणार लाँच; कंपनीने सांगितले स्पेसिफिकेशन्स
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2021 07:01 PM2021-08-09T19:01:04+5:302021-08-09T19:04:16+5:30
iQOO 8 Specifications: कंपनीने सांगितले आहे कि, आगामी iQOO 8 स्मार्टफोनमध्ये 2K रिजोल्यूशन असलेला डिस्प्ले देण्यात येईल
गेले कित्येक दिवस iQOO च्या आगामी फ्लॅगशिप स्मार्टफोनच्या बातम्या येत आहेत. कंपनी आपली आगामी फ्लॅगशिप iQOO 8 सीरिज चीनमध्ये 17 ऑगस्टला लाँच करणार आहे. परंतु लाँच होण्याआधीच या सीरिजची माहिती कंपनीने आपल्या सोशल मीडियावर शेयर केली आहे. कंपनीने शेयर केलेल्या iQOO 8 च्या ऑफिशियल पोस्टवरून आगामी स्मार्टफोनच्या डिस्प्ले रिजोल्यूशन, फास्ट चार्जिंग आणि प्रोसेसरची माहिती मिळाली आहे. पोस्टरनुसार, iQOO 8 स्मार्टफोनसाठी कंपनीने BMW M Motorsport सोबत भागेदारी केली आहे.
iQOO 8 चे स्पेसिफिकेशन्स
कंपनीने सांगितले आहे कि, आगामी iQOO 8 स्मार्टफोनमध्ये 2K रिजोल्यूशन असलेला डिस्प्ले देण्यात येईल. हा एका E5 AMOLED LTPO 10bit डिस्प्ले पॅनल असेल. हा डिस्प्ले 1Hz ते 120Hz रिफ्रेश रेटमध्ये अॅडजस्ट होणाऱ्या डायनॅमिक रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. या स्मार्टफोनमध्ये वेगवान Snapdragon 888 Plus SoC देण्यात येईल. या नव्या स्नॅपड्रॅगन चिपसेटसह येणारा हा जगातील पहिला स्मार्टफोन असेल. या फोनमध्ये 120W चार्जिंग टेक्नॉलॉजी देण्यात येईल.
iQOO 8 स्मार्टफोन पंच होल डिजाईनसह सादर केला जाईल. या स्मार्टफोनचा ब्लॅक कलर ऑप्शन कार्बन फायबर पॅर्टन आणि व्हाइट कलर ऑप्शन BMW स्ट्रिप डिजाइनसह सादर केला जाईल. या फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल. फोनच्या उजवीकडे वॉल्यूम रॉकर आणि पावर बटण असतील. तसेच सिक्योरिटीसाठी या फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात येईल.