काही सेकंदात आउट-ऑफ-स्टॉक होणाऱ्या ‘बाहुबली’ स्मार्टफोनची भारतात विक्री सुरु; मिळतेय हजारांची सूट
By सिद्धेश जाधव | Published: March 2, 2022 08:05 PM2022-03-02T20:05:00+5:302022-03-03T11:07:25+5:30
iQOO 9 च्या 8GB रॅम व्हेरिएंटची किंमत 42,990 रुपये आहे, तर 12GB रॅम व्हेरिएंटची किंमत 46,990 रुपये आहे.
iQOO नं गेल्या आठवड्यात आपली iQOO 9 सीरीज भारतात सादर केली होती. या सीरिजनं चीनमध्ये काही सेकंदांत 116 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीतचे फोन्स विकण्याचा विक्रम केला होता. आता या सीरिजमधील iQOO 9 आणि iQOO 9 Pro भारतात अॅमेझॉनच्या माध्यमातून खरेदीसाठी उपलब्ध झाले आहेत. चला जाणून घेऊया या फोन्सची किंमत, लाँच ऑफर्स आणि स्पेसिफिकेशन्स.
किंमत आणि ऑफर्स
iQOO 9 च्या 8GB रॅम व्हेरिएंटची किंमत 42,990 रुपये आहे, तर 12GB रॅम व्हेरिएंटची किंमत 46,990 रुपये आहे. लाँच ऑफर अंतर्गत क्रेडिट कार्ड ट्रांजेक्शनवर 4,000 रुपयांची सूट देण्यासाठी कंपनीनं ICICI बँकेशी भागेदारी केली आहे. iQOO 9 Pro च्या 8GB रॅम व्हेरिएंटची किंमत 64,990 रुपये आहे. तर 12GB रॅम व्हेरिएंटची किंमत 69,990 रुपये आहे. हा फोन ICICI क्रेडिट कार्डवर विकत घेतल्यास 6,000 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट मिळेल.
iQOO 9 Pro चे स्पेसिफिकेशन्स
iQOO 9 Pro स्मार्टफोनमध्ये 6.78 इंचाचा E5 AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 2K रिजोल्यूशन, 120Hz रिफ्रेश रेट आणि 300Hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. या फोनमध्ये अल्ट्रासॉनिक इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. iQOO 9 Pro स्मार्टफोनमध्ये प्रोसेसिंगसाठी क्वॉलकॉमचा सर्वात वेगवान चिपसेट Snapdragon 8 Gen 1 मिळतो. सोबत 12GB पर्यंत एन्हान्सड LPDDR5 रॅम आणि 256GB पर्यंत UFS 3.1 स्टोरेज देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन 5G कनेक्टिविटीसाठी 18 बँड मिळतात.
फोटोग्राफीसाठी iQOO 9 Pro मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, गिम्बल स्टेबिलायजेशनसह देण्यात आला आहे. सोबत 50 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड सेन्सर आणि 2.5x झूमसह 16 मेगापिक्सलचा पोर्टेट कॅमेरा आहे. या स्मार्टफोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. iQOO 9 Pro स्मार्टफोनमध्ये 4700mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 120W फास्ट चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.
iQOO 9 चे स्पेसिफिकेशन्स
iQOO 9 स्मार्टफोनमध्ये 6.78-इंचाच फुलएचडी+ अॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 300Hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. यात क्वालकॉमचा Snapdragon 888+ चिपसेट मिळतो. जो 12GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह बाजारात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 12 आधारित फनटच ओएसवर चालतो.
या स्मार्टफोनमध्ये VC लिक्विड कूलिंग सिस्टम देण्यात आली आहे. हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरला सपोर्ट करतो. फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. तर मागे ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यात 50MP चा मुख्य कॅमेरा, 13MP ची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 13MP चा डेप्थ सेन्सर आहे. iQOO 9 स्मार्टफोनमध्ये 4350mAh ची बॅटरी आणि 120W फास्ट चार्जिंगसह मिळते.
हे देखील वाचा:
- मासिक पाळी मॉनिटर करणारं Smartwatch लाँच; सिंगल चार्जवर 10 दिवस चालणार, खरेदीवर 500 रुपये ऑफ
- Upcoming Smartphones: नवीन मोबाईल घेण्याआधी थांबा! मार्च 2022 मध्ये येणारे 'हे' जबरदस्त फोन्स बदलू शकतात तुमचा निर्णय
- Oppo नं गुपचुप सादर केला 8GB RAM असलेला स्टायलिश 5G Phone, यात आहे 64MP Camera