स्वस्तात प्रीमियम अनुभव! iQOO 9 आणि iQOO 9 SE स्मार्टफोन दमदार स्पेसिफिकेशन्ससह लाँच, इतकी आहे किंमत
By सिद्धेश जाधव | Published: February 23, 2022 05:27 PM2022-02-23T17:27:18+5:302022-02-23T17:27:49+5:30
iQOO 9 स्मार्टफोन Snapdragon 888+ चिपसेट आणि iQOO 9 SE स्मार्टफोन Snapdragon 888 चिपसेटसह सादर झाला आहे.
iQOO नं भारतात फ्लॅगशिप iQOO 9 लाईनअपमध्ये iQOO 9 Pro, iQOO 9 आणि iQOO 9 SE असे तीन स्मार्टफोन सादर केले आहेत. यातील iQOO 9 आणि iQOO 9 SE हे दोन मॉडेल किफायतशीर किंमतीत फ्लॅगशिप अनुभव देतात.
iQOO 9 चे स्पेसिफिकेशन्स
iQOO 9 स्मार्टफोनमध्ये 6.78-इंचाच फुलएचडी+ अॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 300Hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. यात क्वालकॉमचा Snapdragon 888+ चिपसेट मिळतो. जो 12GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह बाजारात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 12 आधारित फनटच ओएसवर चालतो.
या स्मार्टफोनमध्ये VC लिक्विड कूलिंग सिस्टम देण्यात आली आहे. हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरला सपोर्ट करतो. फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. तर मागे ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यात 50MP चा मुख्य कॅमेरा, 13MP ची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 13MP चा डेप्थ सेन्सर आहे. iQOO 9 स्मार्टफोनमध्ये 4350mAh ची बॅटरी आणि 120W फास्ट चार्जिंगसह मिळते.
iQOO 9 SE चे स्पेसिफिकेशन्स
iQOO 9 SE स्मार्टफोनमध्ये 6.62-इंचाच फुलएचडी+ अॅमोलेड डिस्प्ले मिळतो. जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 1,300 निट्स ब्राईटनेसला सपोर्ट करतो. प्रोसेसिंगची जबाबदारी Snapdragon 888 चिपसेट सांभाळतो. सोबत 12GB पर्यंत रॅम आणि 256GB स्टोरेज मिळते. हा फोन अँड्रॉइड 12 बेस्ड फनटच ओएसवर चालतो.
iQOO 9 SE स्मार्टफोनच्या मागे ट्रिपल कॅमेरा देण्यात आला आहे. ज्यात 48MP चा प्रायमरी कॅमेरा, 13MP चा अल्ट्रा-वाईड सेन्सर आणि 2MP मोनो सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16MP चा सेन्सर मिळेल. iQOO 9 SE स्मार्टफोनमधील 4,500mAh ची बॅटरी 66W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
iQOO 9 सीरिजची किंमत
- iQOO 9 8GB/128GB: 42,990 रुपये
- iQOO 9 12GB/256GB: 46,990 रुपये
- iQOO 9 SE 8GB/128GB: 33,990 रुपये
- iQOO 9 SE 12GB/256GB: 37,990 रुपये
iQOO 9 स्मार्टफोन 23 फेब्रुवारीपासून तर iQOO 9 2 मार्चपासून विकत घेता येईल.
हे देखील वाचा:
- iQOO नं करून दाखवलं! 120W फास्ट चार्जिंग आणि सर्वात वेगवान प्रोसेसरसह iQOO 9 Pro लाँच
- Flipkart Sale: जुन्या फोनच्या बदल्यात 50 रुपयांमध्ये Samsung नवा कोरा Smartphone; 6000mAh ची बॅटरी संपता संपणार नाही