12GB RAM, 120W वेगवान चार्जिंगसह iQOO 9 आणि iQOO 9 Pro लाँच; Snapdragon 8 Gen 1 ची पॉवर
By सिद्धेश जाधव | Published: January 6, 2022 11:56 AM2022-01-06T11:56:35+5:302022-01-06T11:57:06+5:30
iQOO 9 Pro 5G Phone Launch: iQOO 9 आणि iQOO 9 Pro स्मार्टफोन 12GB RAM, Snapdragon 8 Gen 1 चिपसेट आणि 120W fast charging अशा जबरदस्त स्पेक्ससह बाजारात आणले आहेत.
iQOO 9 Pro 5G Phone Launch: iQOO नं नव्या आयकू 9 सीरीज अंतर्गत दोन पॉवरफुल स्मार्टफोन्स सादर केले आहेत. कंपनीनं iQOO 9 आणि iQOO 9 Pro स्मार्टफोन 12GB RAM, Snapdragon 8 Gen 1 चिपसेट आणि 120W fast charging अशा जबरदस्त स्पेक्ससह बाजारात आणले आहेत. चला जाणून घेऊया या 5G Phone ची वैशिष्ट्ये.
iQOO 9 सीरिजचे स्पेसिफिकेशन्स
आयकू 9 5जी मध्ये 6.78 इंचाचा फुलएचडी+ ई5 अॅमोलेड डिस्प्ले 120हर्ट्ज रिफ्रेश रेटसह देण्यात आला आहे. तर आयकू 9 प्रो मढी 6.78 इंचाच्या 2के क्वॉडएचडी+ ई5 अॅमोलेड एलटीपीओ 2.0 कर्व्ड स्क्रीन 120हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 1500निट्स ब्राईटनेसला सपोर्ट करते. हे दोन्ही स्मार्टफोन अँड्रॉइड 12 ओएस बेस्ड ओरिजन ओएसवर चालतात. यात क्वॉलकॉमचा पॉवरफुल स्नॅपड्रॅगन 8 जेन 1 चिपसेट देण्यात आला आहे. सोबत LPDDR5 RAM आणि UFS 3.1 storage टेक्नॉलॉजी मिळते.
या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच मागे 50 मेगापिक्सलच्या प्रायमरी सेन्सरसह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. आयकू 9 प्रो मध्ये 50 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 16 मेगापिक्सलची पोर्टरेट लेन्स मिळते. तर आयकू 9 च्या कॅमेरा सेटअपमध्ये 50 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 12 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे.
आयकू 9 सीरीजच्या या दोन्ही फ्लॅगशिप स्मार्टफोनमधील बॅटरी एक सारखी आहे. यातील 4,700एमएएचची बॅटरी 120वॉट फास्ट चार्जिंगनं चार्ज करता येते. फक्त प्रो व्हर्जनमध्ये 50वॉट वायरलेस फास्ट चार्जिंग आणि 10वॉट रिवर्स चार्जिंगचं फिचर मिळतं.
iQOO 9 Series ची किंमत
- iQOO 9 8GB/128GB: 3,999 युआन (सुमारे 46,500 रुपये)
- iQOO 9 12GB/256GB: 4,399 युआन (सुमारे 51,550 रुपये)
- iQOO 9 12GB/512GB: 3,999 युआन (सुमारे 56,250 रुपये)
- iQOO 9 Pro 8GB/128GB: 4,999 युआन (सुमारे 58,500 रुपये)
- iQOO 9 Pro 12GB/256GB: 5,499 युआन (सुमारे 64,500 रुपये)
- iQOO 9 Pro 12GB/512GB: 5,999 युआन (सुमारे 70,000 रुपये)
हे देखील वाचा:
Samsung कडून न्यू ईयरचं गिफ्ट; TV विकत घेतल्यास साउंडबार आणि टॅबलेट मोफत
भन्नाट! रंग बदलणारा भारतातील पहिला स्मार्टफोन लाँच; 108MP कॅमेरा, 16GB रॅमसह आला Vivo चा शानदार फोन