रेकॉर्ड ब्रेक सेल करणारा Smartphone च्या भारतीय लाँचची तारीख ठरली; पाहा तुमच्या बजेटमध्ये आहे का किंमत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2022 07:45 PM2022-02-11T19:45:24+5:302022-02-11T19:46:01+5:30

iQOO 9 Series India Launch: चीनमध्ये विक्रीचे विक्रम करणारी iQOO 9 सीरीज लवकरच देशात येणार आहे, हे कन्फर्म झालं आहे. 

iQOO 9 Series India Launch Officially Confirmed Check Price  | रेकॉर्ड ब्रेक सेल करणारा Smartphone च्या भारतीय लाँचची तारीख ठरली; पाहा तुमच्या बजेटमध्ये आहे का किंमत 

रेकॉर्ड ब्रेक सेल करणारा Smartphone च्या भारतीय लाँचची तारीख ठरली; पाहा तुमच्या बजेटमध्ये आहे का किंमत 

Next

iQOO हा विवोचा सब ब्रँड आहे, ज्यात कंपनी जबरदस्त स्मार्टफोन सादर करते. अशीच एक सीरीज भारतीयांच्या भेटीला येत आहे. या सीरीजमध्ये iQOO 9, iQOO 9 Pro आणि iQOO 9 SE असे तीन मॉडेल सादर केले जातील. कंपनीनं स्वतःहून या सीरिजच्या लाँचची माहिती दिली आहे. ही सीरिज या महिन्याच्या अखेरपर्यंत लाँच केली जाईल. लिक्समधून iQOO 9 सीरीजच्या भारतीय व्हेरिएंटची किंमत देखील समोर आली आहे.  

iQOO 9 सीरीजची संभाव्य किंमत

या सीरिजमधील सर्वात छोटा iQOO 9 SE स्मार्टफोन 35,000 रुपयांच्या आसपास उपलब्ध होईल. तर iQOO 9 साठी 45,000 रुपये मोजावे लागू शकतात. लाईनअपमधील मोठा iQOO 9 Pro स्मार्टफोन 55,000 रुपयांमध्ये विकला जाऊ शकतो. अचूक अशी तारीख समोर आली नसली तरी चीनमध्ये विक्रीचे विक्रम करणारी iQOO 9 सीरीज लवकरच देशात येणार आहे, हे कन्फर्म झालं आहे.  

iQOO 9 आणि iQOO 9 Pro चे स्पेसिफिकेशन्स   

या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच मागे 50 मेगापिक्सलच्या प्रायमरी सेन्सरसह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. आयकू 9 प्रो मध्ये 50 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 16 मेगापिक्सलची पोर्टरेट लेन्स मिळते. तर आयकू 9 च्या कॅमेरा सेटअपमध्ये 50 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 12 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे.     

आयकू 9 5जी मध्ये 6.78 इंचाचा फुलएचडी+ ई5 अ‍ॅमोलेड डिस्प्ले 120हर्ट्ज रिफ्रेश रेटसह देण्यात आला आहे. तर आयकू 9 प्रो मढी 6.78 इंचाच्या 2के क्वॉडएचडी+ ई5 अ‍ॅमोलेड एलटीपीओ 2.0 कर्व्ड स्क्रीन 120हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 1500निट्स ब्राईटनेसला सपोर्ट करते. हे दोन्ही स्मार्टफोन अँड्रॉइड 12 ओएस बेस्ड ओरिजन ओएसवर चालतात. यात क्वॉलकॉमचा पॉवरफुल स्नॅपड्रॅगन 8 जेन 1 चिपसेट देण्यात आला आहे. सोबत LPDDR5 RAM आणि UFS 3.1 storage टेक्नॉलॉजी मिळते.     

आयकू 9 सीरीजच्या या दोन्ही फ्लॅगशिप स्मार्टफोनमधील बॅटरी एक सारखी आहे. यातील 4,700एमएएचची बॅटरी 120वॉट फास्ट चार्जिंगनं चार्ज करता येते. फक्त प्रो व्हर्जनमध्ये 50वॉट वायरलेस फास्ट चार्जिंग आणि 10वॉट रिवर्स चार्जिंगचं फिचर मिळतं. 

हे देखील वाचा:

Web Title: iQOO 9 Series India Launch Officially Confirmed Check Price 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.