गेम खेळणारेही होतील 'ऑफिसर', 6 महिन्यांत 10 लाख कमावण्याची ऑफर!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2023 08:09 PM2023-05-31T20:09:54+5:302023-05-31T20:10:24+5:30
Gaming Jobs : तुम्ही पॅशनेट गेमर असाल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. याठिकाणी गेम खेळण्यावर टोमणे ऐकण्याऐवजी, तुम्हाला एक मजबूत पॅकेज मिळेल.
जर तुम्हाला मोबाईल गेम खेळण्याची आवड असेल तर एक उत्तम ऑफर तुमची वाट पाहत आहे. दिग्गज स्मार्टफोन कंपनी iQOO ने चीफ गेमिंग ऑफिसर (CGO) साठी चांगला उमेदवार शोधण्यास सुरुवात केली आहे. तुम्ही पॅशनेट गेमर असाल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. याठिकाणी गेम खेळण्यावर टोमणे ऐकण्याऐवजी, तुम्हाला एक मजबूत पॅकेज मिळेल.
CGO म्हणून काम करण्यासाठी कंपनी 6 महिन्यांसाठी 10 लाख रुपये देईल. ही ऑफर 25 वर्षांखालील गेमर्ससाठी आहे, ज्यांच्याकडे मोबाइल गेमिंग आणि ई-स्पोर्ट्स आणखी चांगले बनवण्याची क्षमता आहे. 18 ते 25 वर्षे वयोगटातील उमेदवार IQ CGO कॉन्टेस्टमध्ये भाग घेऊ शकतात. मात्र, उमेदवार भारताचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
iQOO CGO कसा करावा अर्ज?
तुम्हाला IQ मध्ये CGO पदासाठी अर्ज करायचा असेल, तर तुम्ही ऑनलाइन फॉर्म भरू शकता. अर्ज करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.
- IQ CGO होण्यासाठी कंपनीच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- वेबसाइटवर iQOO CGO चा ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा.
- Register Here ऑप्शनवर टॅप करा.
- यानंतर एक फॉर्म ओपन होईल, तो व्यवस्थित भरा.
- फॉर्म भरल्यानंतर सबमिट करा.
Passionate about gaming?#iQOO is on the hunt for its 1st #ChiefGamingOfficer. Join the quest to provide the ultimate smartphone gaming experience to the world. Register now for a chance to own the title, grab ₹10 Lakhs & flex those epic bragging rights. https://t.co/khyYvMTe2rpic.twitter.com/FryeREdCVY
— iQOO India (@IqooInd) May 30, 2023
11 जूनपर्यंत करू शकता रजिस्ट्रेशन
जर तुम्ही तरुण असाल आणि तुमचे वय 25 वर्षांपेक्षा कमी असेल तर ही एक उत्तम ऑफर आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाइट व्यतिरिक्त, पात्र उमेदवार Instagram हँडलद्वारे देखील अर्ज करू शकतात. 30 मे पासून रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू झाली आहे. CGO पदासाठी रजिस्ट्रेशन करण्याची अंतिम तारीख 11 जून आहे.
कसे असेल सिलेक्शन?
चार एलिमिनेशन राउंडनंतर CGO ची निवड केली जाईल. एक ज्युरी आणि AIQU ची लीडरशिप टीम सिलेक्शन प्रोसेस फॉलो करून CGOs निवडतील. कंपनीने स्पष्ट केले आहे की, CGO हे पद कायम किंवा पूर्णवेळ नोकरी नाही. तुम्ही इतरत्र काम करत असल्यास, तुम्ही सध्याच्या नियोक्त्याच्या परवानगीने या पदासाठी अर्ज करू शकता.