12GB RAM आणि शक्तिशाली प्रोसेसरसह iQOO Neo 6 स्मार्टफोन Google वर लिस्ट; लवकरच येणार बाजारात
By सिद्धेश जाधव | Published: December 3, 2021 07:39 PM2021-12-03T19:39:58+5:302021-12-03T19:40:14+5:30
iQOO Neo 6 5G Phone: iQOO Neo 6 5G लवकरच 12GB RAM, 44W Fast Chartging आणि Snapdragon 888 चिपसेटसह सादर केला जाऊ शकतो.
iQOO सध्या iQOO 9 सह Neo सीरीजवर देखील काम करत आहे. कंपनीचा आगामी iQOO Neo 6 स्मार्टफोन Google Play Console लिस्ट करण्यात आला आहे. ही लिस्टिंग MySmartPrice च्या रिपोर्टमधून समोर आली आहे. गुगल प्लेवर हा फोन V2154A मॉडेल नंबरसह लिस्ट करण्यात आला आहे. इथून या फोनच्या डिस्प्ले, चिपसेट आणि इतर स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली आहे.
iQOO Neo 6 5G Phone चे स्पेसिफिकेशन्स
iQOO Neo 6 स्मार्टफोन सर्वप्रथम चीनमध्ये सादर केला जाईल. यासाठी 2022 च्या पहिल्या तिमाहीची टाइम फ्रेम देण्यात आली आहे. Google Play Console लिस्टिंगनुसार हा स्मार्टफोन 12GB RAM सह सादर केला जाऊ शकतो. या फोनमध्ये FHD+ (1,080 X 2,400) पिक्सल रिजोल्यूशन मिळेल. हा डिस्प्ले एलसीडी असेल कि ओलेड हे मात्र अजून समजलं नाही.
iQOO Neo 6 स्मार्टफोनला Qualcomm च्या Snapdragon 888 5G चिपसेटची प्रोसेसिंग पॉवर देण्यात येईल, असे गुगल प्ले लिस्टिंगमधून समजलं आहे. या प्रोसेसरला ग्राफिक्ससाठी Adreno 660 GPU ची जोड देण्यात येईल. हा फोन Android 11 आधारित कंपनीच्या Origin OS 1.0 कस्टम स्किनवर चालेल. या फोनमधील बॅटरीच्या क्षमतेची माहिती मिळाली नाही, परंतु 3C लिस्टिंगमधून 66W फास्ट चार्जिंग सपोर्टचा खुलासा झाला आहे. कंपनी iQOO Neo 6 SE आणि Neo 5s वर देखील काम करत आहे.