मीडियाटेक डायमेन्सिटी 8200 प्रोसेसर असलेला जगातील पहिला फोन लाँच; मिळतील अनेक जबरदस्त फीचर्स
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2022 06:13 PM2022-12-08T18:13:40+5:302022-12-08T18:15:08+5:30
फोनमध्ये 6.7-इंच फुल-एचडी प्लस (2400×1080 पिक्सेल) रिझोल्यूशन असलेली एमोलेड डिस्प्ले आहे.
नवी दिल्ली : हँडसेट निर्मात्या कंपनी आयक्यूने आपला नवीन स्मार्टफोन iQOO Neo 7 SE ग्राहकांसाठी लाँच केला आहे. विशेष म्हणजे, हा नवीनतम iQoo मोबाईल फोन जगातील पहिला स्मार्टफोन आहे, ज्यामध्ये कंपनीने स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी मीडियाटेक डायमेन्सिटी 8200 चिपसेट वापरला आहे. या Neo 7 SE मॉडेलच्या किंमती आणि फीचर्सबद्दल सविस्तर जाणून घ्या...
डिस्प्ले : फोनमध्ये 6.7-इंच फुल-एचडी प्लस (2400×1080 पिक्सेल) रिझोल्यूशन असलेली एमोलेड डिस्प्ले आहे. या डिव्हाइसमध्ये 120 हर्ट्जचा रीफ्रेश रेट मिळत आहे आणि हा हँडसेट 20:9 आस्पेक्ट रेशोसह येतो.
प्रोसेसर : स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी मीडियाटेक डायमेन्सिटी 8200 ऑक्टा-कोर चिपसेटचा वापर करण्यात आला आहे.
बॅटरी क्षमता : 120 वॅट फास्ट चार्ज सपोर्टसह 5000 एमएएच बॅटरी फोनला चार्ज करण्यासाठी देण्यात आली आहे.
कॅमेरा सेटअप : आयक्यू Neo 7 SE स्मार्टफोनच्या मागील पॅनलवर एक ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे, त्यात 64-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेन्सर, 2-मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा सेन्सर आणि 2-मेगापिक्सलचा डेप्थ कॅमेरा सेन्सर आहे. जसे की, Neo 6 SE 5G मध्ये अल्ट्रावाइड कॅमेरा सेन्सर दिलेला असल्याने, या डिव्हाइसमध्ये तुम्हाला हा सेन्सर नसल्याचे भासू शकते. सेल्फी प्रेमींसाठी, फोनच्या पुढील भागात 16-मेगापिक्सेल कॅमेरा सेन्सर आहे.
'या' स्मार्टफोनची किंमत
कंपनीने हा आयक्यू स्मार्टफोन पाच वेगवेगळ्या व्हेरिएंटमध्ये लाँच केला आहे. याच्या बेस व्हेरिएंटमध्ये 8 GB रॅमसह 128 GB स्टोरेज आहे, या मॉडेलची किंमत 2099 चीनी युआन (सुमारे 24 हजार 800 रुपये) आहे. 8 जीबी रॅम असलेल्या 256 जीबी व्हेरिएंटची किंमत 2299 चीनी युआन (सुमारे 27 हजार 100 रुपये), 12 जीबी रॅम असलेल्या 256 जीबी मॉडेलची किंमत 2499 चीनी युआन (सुमारे 29 हजार 500 रुपये) आणि 16 जीबी रॅमसह 256 जीबी व्हेरिएंटची किंमत 2799 चीनी युआन (सुमारे 33 हजार रुपये) आहे. या हँडसेटचा आणखी एक प्रकार आहे, ज्यामध्ये 12 जीबी रॅमसह 512 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे, या मॉडेलची किंमत 2899 चीनी युआन (सुमारे 34 हजार 200 रुपये) आहे. फोनचे तीन कलर स्टार ब्लॅक, इलेक्ट्रॉनिक ब्लू आणि गॅलेक्सी व्हेरिएंट लाँच करण्यात आले आहेत.