iQOO नं लाँच केला सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन, रेडमी-रियलमीची सत्ता जाणार?
By सिद्धेश जाधव | Published: June 22, 2022 12:33 PM2022-06-22T12:33:21+5:302022-06-22T12:33:30+5:30
iQOO U5e मध्ये Dimensity 700 प्रोसेसर, 5000mAh ची बॅटरी, 13MP कॅमेरा आणि 6GB रॅम देण्यात आला आहे.
बजेट सेगमेंटमध्ये रेडमी आणि रियलमी ब्रँड्सनी धुमाकूळ घातला आहे. या कंपन्यांना आता iQOO कडून टक्कर मिळेल असं दिसतंय. कंपनीनं चीनमध्ये आपला सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन iQOO U5e लाँच केला आहे. या हँडसेटमध्ये Dimensity 700 प्रोसेसर, 5000mAh ची बॅटरी, 13MP कॅमेरा आणि 6GB रॅम देण्यात आला आहे. चला जाणून घेऊया iQOO U5e स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स, फिचर्स आणि किंमत.
iQOO U5e चे स्पेसिफिकेशन्स
iQOO U5e स्मार्टफोनमध्ये 6.51-इंचाचा IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. जो टीयरड्रॉप नॉचसह HD+ रिजोल्यूशन, 20:9 अस्पेक्ट रेश्यो, 60Hz रिफ्रेश रेट आणि 269ppi पिक्सल डेनसिटीला सपोर्ट करतो. स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यात 13MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 2MP चा मॅक्रो कॅमेरा सेन्सर LED फ्लॅशसह देण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये 8MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
iQOO U5e स्मार्टफोनमध्ये मीडियाटेकच्या Dimensity 700 प्रोसेसरची ताकद देण्यात आली आहे. सोबत 6GB पर्यंतच्या LPDDR4x RAM आणि 128GB पर्यंतची UFS 2.1 स्टोरेज आहे. हा फोन Android 12 OS आधारित OriginOS Ocean वर चालतो. फोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी या ड्युअल SIM 5G फोनयामध्ये Wi-Fi 802.11ac, Bluetooth 5.1, USB-C पोर्ट आणि 3.5mm ऑडियो जॅक मिळतो. या फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी आणि 18W चार्जिंग स्पीड देण्यात आला आहे.
iQOO U5e ची किंमत
iQOO U5e स्मार्टफोनच्या 4GB रॅम व 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 1,399 युआन (सुमारे 16,300 रुपये) आहे. तर 6GB रॅम व 128GB स्टोरेज मॉडेल 1,499 युआन (सुमारे 17,400 रुपये) मध्ये विकत घेता येईल. हा स्मार्टफोन डार्क ब्लॅक आणि सिल्वर व्हाईट कलरमध्ये सादर करण्यात आला आहे.