25 दिवस चालणार बॅटरी! ‘या’ किफायतशीर स्मार्टफोनमध्ये 8GB रॅम; इतकी आहे किंमत
By सिद्धेश जाधव | Published: March 28, 2022 12:00 PM2022-03-28T12:00:51+5:302022-03-28T12:01:01+5:30
iQOO U5x स्मार्टफोन 8GB RAM, 5000mAh बॅटरी आणि 3 कॅमेरे देण्यात आले आहेत.
iQOO U5x स्मार्टफोन बजेट सेगमेंटमध्ये लाँच झाला आहे. कंपनीनं हा 4G स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 680 प्रोसेसर, 8GB RAM आणि 5000mAh बॅटरीसह चीनमध्ये आला आहे. हा फोन भारतात येईल की नाही याची माहिती कंपनीनं दिली नाही. परंतु जर हा फोन देशात आला तर नक्कीच बजेट सेगमेंटमध्ये रेडमी-रियलमीला चांगलीच टक्कर देईल.
iQOO U5x चे स्पेसिफिकेशन्स
iQOO च्या या स्मार्टफोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 10W चार्जिंगला सपोर्ट करतो. ही बॅटरी स्टँडबाय मोडमध्ये 25 दिवस चालू शकते, असा दावा कंपनीनं केला आहे. तसेच सिंगल चार्जमध्ये हा फोन 10 तास गेमिंग करू देतो. या स्मार्टफोन क्वालकॉमचा Snapdragon 680 प्रोसेसर देण्यात आला आहे. हा फोन Android 11 बेस्ड Origin OS वर चालतो.
iQOO U5x स्मार्टफोनमध्ये 6.5-इंचाचा एचडी+ एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. iQoo U5x स्मार्टफोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 13-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि 2-मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर एलईडी फ्लॅशसह देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 8-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. बेसिक कनेक्टिव्हिटीसह यात साईड फिंगरप्रिंट स्कॅनर मिळतो.
किंमत
या स्मार्टफोनचे दोन व्हेरिएंट चीनमध्ये आले आहेत. 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेल्या बेस व्हेरिएंटची किंमत 899 युआन (सुमारे 10,700 रुपये) आहे. तर 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह टॉप एन्ड व्हेरिएंट 1,099 युआन (सुमारे 13,100 रुपये) मध्ये विकत घेता येईल. या डिवाइसचे पोलर ब्लू आणि स्टार ब्लॅक कलर व्हेरिएंट बाजारात आले आहेत.