55W फास्ट चार्जिंगसह iQOO Z5 5G स्मार्टफोन पुढील आठवड्यात येणार चाहत्यांच्या भेटीला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2021 07:05 PM2021-09-17T19:05:30+5:302021-09-17T19:05:47+5:30
iQOO Z5 India Launch: पुढील आठवड्यात चीनमध्ये सादर झाल्यानंतर ऑक्टोबरमध्ये iQOO Z5 5G हा फोन भारतात सादर केला जाऊ शकतो.
Vivo चा सब-ब्रँड iQOO आपल्या नवीन स्मार्टफोनच्या लाँचची तयारी करत आहे. जबरदस्त फ्लॅगशिप सीरिज सादर केल्यानंतर कंपनी आता मिडरेंजकडे वळत आहे. कंपनीचा आगामी स्मार्टफोन Z-सीरीज अंतर्गत होम मार्केट चीनमध्ये 23 सप्टेंबरला लाँच केला जाईल. हा फोन Z5 5G या नावाने ग्राहकांच्या भेटीला येईल. चीननंतर हा फोन भारतात येणार असल्याची माहिती iQOO इंडियाने दिली आहे. इथे फोनची विक्री Amazon India च्या माध्यमातून केली जाईल.
iQOO Z5 चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स
iQOO Z5 5G चे काही टीजर पोस्टर ऑनलाईन लीक झाले आहेत. या स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले दिला जाऊ शकतो. या डिस्प्लेचा टच सॅंप्लिंग रेट 240Hz असेल. iQOO Z5 स्मार्टफोनच्या डिस्प्लेला HDR10 आणि TUV Rheinland सर्टिफिकेशन्स मिळाले आहे. परंतु हा IPS LCD पॅनल असेल कि AMOLED ते मात्र समजले नाही.
iQOO Z5 स्मार्टफोनमध्ये Snapdragon 778G SoC चिपसेट दिला जाऊ शकतो. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार या फोनमध्ये नवीन आणि वेगवान LPDDR5 RAM आणि UFS 3.1 स्टोरेज दिली जाईल. हा फोन 8GB पर्यंत RAM आणि 256GB पर्यंतच्या इंटरनल स्टोरेजसह सादर केला जाईल. या फोनमधील बॅटरी क्षमतेची माहिती मिळाली नाही. परंतु यातील चार्जींग स्पीड 55W असेल. पुढील आठवड्यात चीनमध्ये सादर झाल्यानंतर ऑक्टोबरमध्ये हा फोन भारतात सादर केला जाऊ शकतो.