सॅमसंग-रेडमीशी घेतलाय ‘या’ छोट्या ब्रँडनं पंगा; फक्त 13,499 मध्ये दमदार 5G फोन, पहिला सेल आज
By सिद्धेश जाधव | Published: March 22, 2022 11:42 AM2022-03-22T11:42:56+5:302022-03-22T11:43:16+5:30
iQOO Z6 5G Price: iQOO Z6 5G हा फोन Snapdragon 695 5G प्रोसेसर, 8GB पर्यंत रॅम, 120Hz रिफ्रेश रेट, 5000mAh ची बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्यासह लाँच झाला आहे.
सध्या बजेट 5G फोन सेगमेंटमध्ये Redmi Note 11 Pro+ 5G, Vivo T1 5G, आणि Samsung Galaxy A52 असे फोन्स उपलब्ध आहेत. परंतु काही दिवसांपूर्वी या रेंजमध्ये iQOO Z6 5G स्मार्टफोनची एंट्री झाली आहे. हा फोन Snapdragon 695 5G प्रोसेसर, 8GB पर्यंत रॅम, 120Hz रिफ्रेश रेट, 5000mAh ची बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्यासह लाँच झाला आहे. आज दुपारी 12 वाजल्यापासून या स्मार्टफोनची विक्री शॉपिंग साईट Amazon वर सुरु होईल.
अशी मिळवा सूट
iQOO Z6 5G स्मार्टफोनच्या 4GB रॅम आणि 128GB व्हेरिएंटची किंमत 15,499 रुपये आहे. तर 6GB रॅम व 128GB स्टोरेजची किंमत 16,999 रुपये आणि 8GB रॅम व 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 17,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन HDFC बँक कार्ड किंवा EMI ट्रँजॅक्शनवर विकत घेतल्यास तुम्हाला 2,000 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट मिळेल. त्यामुळे बेस व्हेरिएंट फक्त 13,499 रुपयांमध्ये घरी घेऊन येता येईल.
iQOO Z6 5G चे स्पेसिफिकेशन्स
iQOO Z6 5G स्मार्टफोन 6.58-इंचाच्या FHD+ डिस्प्लेसह सादर करण्यात आला आहे. जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 240Hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. कंपनीनं यात Panda Glass ची सुरक्षा दिली आहे. हा फोन अँड्रॉइड 12 बेस्ड फनटच ओएस 12 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी Qualcomm Snapdragon 695 चिपसेट आणि Adreno 619 GPU मिळतो. सोबत 8GB पर्यंत RAM आणि 128GB स्टोरेज देण्यात आली आहे. जी मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 1TB पर्यंत वाढवता येते.
iQOO Z6 5G स्मार्टफोनमध्ये साईड फिंगरप्रिंट सेन्सरसह बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्स मिळतात. यात पावर बॅकअपसाठी 5,000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. iQOO Z6 स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनचा प्रायमरी कॅमेरा 50MP चा आहे. त्याचबरोबर 2MP चा मॅक्रो कॅमेरा आणि 2MP ची पोर्टेट लेन्स दिला मिळते. फ्रंटला 16MP चा सेल्फी शुटर आहे.