iQOO Z6 5G की Realme 9 Pro? एकच प्रोसेसर असलेल्या फोन्स पैकी कोणता विकत घ्यावा? जाणून घ्या
By सिद्धेश जाधव | Published: March 17, 2022 08:20 PM2022-03-17T20:20:49+5:302022-03-17T20:21:01+5:30
iQOO Z6 5G Vs Realme 9 Pro: iQOO Z6 5G आणि Realme 9 Pro मध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 695 5जी चिपसेट मिळतो. त्यामुळे ग्राहकांना यापैकी कोणता स्मार्टफोन घ्यावा असा प्रश्न नक्की पडेल.
iQOO Z6 स्मार्टफोन नुकताच भारतीय बाजारात आला आहे. या फोनमध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 695 5जी चिपसेट मिळतो. जो Realme 9 Pro मध्ये देखील देण्यात आला आहे. त्यामुळे ग्राहकांना यापैकी कोणता स्मार्टफोन घ्यावा असा प्रश्न पडेल. पुढे आम्ही या दोन्ही स्मार्टफोन्सची तुलना केली आहे ज्यातून चित्र स्पष्ट होईल.
iQOO फोनमध्ये 6.58 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले आणि 120 हर्ट्ज रिफ्रेश रेटसह देण्यात आला आहे. तर Realme 9 Pro फोन 6.6 इंचाच्या आयपीएस एलसीडी डिस्प्ले आणि 120 हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. iQOO Z6 5G आणि Realme 9 Pro दोन्ही स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 695 5G प्रोसेसर देण्यात आला आहे. iQOO Z6 5G आणि Realme 9 Pro दोन्ही स्मार्टफोनमध्ये एक सामान 128GB मेमरी मिळते.
iQOO Z6 फोनच्या मागे 50MP + 2MP + 2MP कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. तर Realme 9 Pro हँडसेटमध्ये 64MP + 8MP + 2MP कॅमेरा सेटअप मिळतो. दोन्ही फोन्समध्ये 16MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. iQOO Z6 5G फोनमध्ये 18W फास्ट चार्जिंग आणि Realme 9 Pro हँडसेटमध्ये 33W फास्ट चार्जिंग मिळते. परंतु दोन्ही फोन्समधील बॅटरी क्षमता 5000mAh आहे.
iQOO Z6 ची किंमत 13,999 रुपयांपासून सुरु होते तर Realme 9 Pro ची किंमत 17,999 रुपयांपासून सुरु होते.
iQOO Z6 | Realme 9 Pro | |
---|---|---|
डिस्प्ले | 6.58 इंच फुल एचडी, 120Hz | 6.6 इंच आयपीएस एलसीडी, 120Hz |
प्रोसेसर | क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695 5जी | क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695 5जी |
मेमरी | 128GB | 128GB |
कॅमेरा | 50MP+2MP+2MP रियर, 16MP सेल्फी | 64MP+8MP+2MP रियर, 16MP सेल्फी |
बॅटरी | 5000mAh, 18W | 5000mAh, 33W |
किंमत | 13,999 रुपये | 17,999 रुपये |