बजेट सेगमेंटमधील सर्वात वेगवान 5G स्मार्टफोन; भारतीय लाँचचा मुहूर्त ठरला 

By सिद्धेश जाधव | Published: April 14, 2022 07:38 PM2022-04-14T19:38:29+5:302022-04-14T19:38:35+5:30

भारतीय बाजारात iQOO Z6 Pro 5G स्मार्टफोन 27 एप्रिलला लाँच केला जाईल.

iQOO Z6 Pro 5G India Launch Date 27 April Price Specification  | बजेट सेगमेंटमधील सर्वात वेगवान 5G स्मार्टफोन; भारतीय लाँचचा मुहूर्त ठरला 

बजेट सेगमेंटमधील सर्वात वेगवान 5G स्मार्टफोन; भारतीय लाँचचा मुहूर्त ठरला 

Next

iQOO Z6 स्मार्टफोन भारतात गेल्याच महिन्यात लाँच झाला आहे. याची किंमत 17 हजार रुपयांपासून सुरु होते. आहे कंपनीनं iQOO Z6 Pro 5G स्मार्टफोन भारतात येणार असल्याची माहिती दिली आहे. तसेच हा बजेट सेगमेंटमधील सर्वात वेगवान स्मार्टफोन असेल, असा दावा देखील कंपनीनं केला आहे. आयकूनं आपल्या सोशल मीडिया हॅन्डल्सवरून नव्या 5G स्मार्टफोनच्या लाँचची माहिती दिली आहे. त्यानुसार भारतीय बाजारात iQOO Z6 Pro 5G स्मार्टफोन 27 एप्रिलला लाँच केला जाईल.  

iQOO Z6 Pro चे लीक स्पेसिफिकेशन्स 

आगामी iQOO Z6 Pro स्मार्टफोनमध्ये OLED डिस्प्ले देण्यात येईल, हा पॅनल 90Hz रिफ्रेश रेटसह बाजारात येऊ शकतो. विशेष म्हणजे या सीरिजमध्ये OLED पॅनलसह येणारा हा पहिला फोन असेल. स्मार्टफोनमध्ये 1300निट्स ब्राईटनेस मिळेल. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 778G चिपसेट मिळेल. रॅम आणि स्टोरेजची माहिती मात्र मिळाली नाही.  

iQOO Z6 Pro स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात येईल. ज्यात 64 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा असेल. त्याचबरोबर 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि एक मायक्रो लेन्स मिळेल. स्मार्टफोनमध्ये 66W फास्ट चार्जिंग सपोर्टसह बॅटरी मिळेल. Antutu बेंचमार्कवर या डिवाइसला 550k पॉईंट्स मिळाले आहेत. हा फोन भारतात 25,000 रुपयांचा बजेटमध्ये सादर केला जाऊ शकतो. या सेगमेंटमध्ये वनप्लस, रेडमी, मोटोरोला, रियलमी आणि सॅमसंगकडून चांगली टक्कर मिळू शकते.  

 

Web Title: iQOO Z6 Pro 5G India Launch Date 27 April Price Specification 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.