16GB RAM आणि 5000mAh बॅटरीसह iQOO चे दोन दणकट स्मार्टफोन आले भारतात; किंमत आहे कमी

By सिद्धेश जाधव | Published: April 27, 2022 04:36 PM2022-04-27T16:36:54+5:302022-04-27T16:38:14+5:30

विवोच्या सब-ब्रँडनं iQOO Z6 Pro 5G आणि iQOO Z6 4G भारतात उतरवले आहेत. ‘झेड 6’ लाईनअपमध्ये आता iQOO Z6 5G सह तीन स्मार्टफोन झाले आहेत.

iQOO Z6 Pro 5G iQOO Z6 4G Launched In India Price Specification Sale  | 16GB RAM आणि 5000mAh बॅटरीसह iQOO चे दोन दणकट स्मार्टफोन आले भारतात; किंमत आहे कमी

16GB RAM आणि 5000mAh बॅटरीसह iQOO चे दोन दणकट स्मार्टफोन आले भारतात; किंमत आहे कमी

Next

iQOO ने आज भारतात दोन दणकट स्मार्टफोन सादर केले आहेत. विवोच्या सब-ब्रँडनं iQOO Z6 Pro 5G आणि iQOO Z6 4G भारतात उतरवले आहेत. ‘झेड 6’ लाईनअपमध्ये आता iQOO Z6 5G सह तीन स्मार्टफोन झाले आहेत. हे फोन्स मिड रेंज सेगमेंटमध्ये रियलमी, रेडमी आणि मोटोरोलाला जबरदस्त टक्कर देतील. पुढे या दोन्ही फोन्सच्या किंमत आणि फीचर्सची माहिती देण्यात आली आहे.  

iQOO Z6 Pro चे स्पेसिफिकेशन्स 

iQOO Z6 Pro फोनमध्ये 6.44-इंचाचा फुलएचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेटसह देण्यात आला आहे. प्रोसेसिंगसाठी कंपनीनं Qualcomm Snapdragon 778G 5G चिपसेटचा वापर केला आहे. 12GB RAM सह 4GB व्हर्च्युअल रॅम देखील मिळतो. तसेच iQOO Z6 Pro मध्ये 256GB ची इंटरनल स्टोरेज मिळते. हा फोन अँड्रॉइड 12 आधारित फनटच 12 ओएसवर चालतो.  

iQOO Z6 Pro च्या मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतो. या कॅमेरा सेटअपमध्ये 64 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सलची 116 डिग्री अल्ट्रा-वाईड लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा मिळतो. फ्रंटला 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. या फोनमध्ये पावर बॅकअपसाठी 4,700mAh ची बॅटरी मिळते जी 66 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.  

iQOO Z6 चे स्पेसिफिकेशन्स 

iQOO Z6 मध्ये 6.58-इंचचा फुल-एचडी+ रिजोल्यूशन असलेला डिस्प्ले आहे. हा IPS LCD पॅनल 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. कंपनीनं या फोनमध्ये क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगन 680 चिपसेटची पावर दिली आहे. सोबत 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज मिळते. हा डिवाइस देखील अँड्रॉइड 12 आधारित फनटच 12 ओएसवर चालतो. 

फोटोग्राफीसाठी हँडसेटमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा आहे. तर फ्रंटला 16 मेगापिक्सलचा सेल्फी शुटर देण्यात आला आहे. iQOO Z6 मध्ये पावर बॅकअपसाठी 5000mAh ची बॅटरी आहे देण्यात आली आहे, जी 44W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. 

iQOO Z6 आणि iQOO Z6 Pro ची किंमत 

  • iQOO Z6 6GB/128GB: 14,999 रुपये  
  • iQOO Z6 8GB/128GB: 17,999 रुपये  
  • iQOO Z6 Pro 8GB/128GB: 24,999 रुपये  
  • iQOO Z6 Pro 12GB/256GB: 27,999 रुपये  

या फोन्सची विक्री 4 मेपासून कंपनीच्या अधिकृत वेबसाईटसह Amazon वरून केली जाईल. 

 

Web Title: iQOO Z6 Pro 5G iQOO Z6 4G Launched In India Price Specification Sale 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.