रेडमीच्या मागे हात धुवून लागलाय छोटासा ब्रँड; आता सादर करणार 25 हजारांत दमदार मोबाईल

By सिद्धेश जाधव | Published: April 9, 2022 11:55 AM2022-04-09T11:55:21+5:302022-04-09T11:55:36+5:30

iQOO Z6 Pro 5G स्मार्टफोन बेंचमार्किंग साईटवर दिसला आहे, हा फोन Snapdragon 778G SoC सह सादर केला जाऊ शकतो. 

iQOO Z6 Pro 5G Price In India Revealed May Launch With Snapdragon 778G SoC  | रेडमीच्या मागे हात धुवून लागलाय छोटासा ब्रँड; आता सादर करणार 25 हजारांत दमदार मोबाईल

रेडमीच्या मागे हात धुवून लागलाय छोटासा ब्रँड; आता सादर करणार 25 हजारांत दमदार मोबाईल

googlenewsNext

iQOO हा विवोचा सब-ब्रँड आहे, जो सध्या रेडमीच्या नाकात दम करत आहे. आयकूनं काही दिवसांपूर्वी कंपनीच्या सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन iQOO Z6 5G लाँच केला आहे. आता लवकरच कंपनी iQOO Z6 Pro 5G स्मार्टफोन भारतात सादर करू शकते, अशी माहिती टेक वेबसाईट 91Mobiles नं दिली आहे. काही दिवसांपूर्वी हा आगामी आयकू फोन बेंचमार्किंग साईट अनटुटूवर देखील दिसला होता.  

iQOO Z6 Pro 5G चे लीक स्पेसिफिकेशन  

iQOO Z6 Pro 5G ची जास्त माहिती समोर आली नाही. परंतु अनटुटू लिस्टिंगवरून या फोनच्या प्रोसेसरची माहिती मिळाली आहे. आगामी आयकू मोबाईल क्वॉलकॉमच्या Snapdragon 778G SoC सह बेंचमार्किंग साईटवर लिस्ट करण्यात आला आहे. iQOO Z6 Pro 5G स्मार्टफोननं AnTuTu वर 550K स्कोर मिळवला आहे. डिस्प्ले, कॅमेरा आणि मेमरी स्पेसिफिकेशन्सची माहिती लाँचच्या आधी समोर येऊ शकते.  

iQOO Z6 Pro 5G चा लाँच आणि संभाव्य किंमत 

91Mobiles च्या रिपोर्टनुसार, हा फोन भारतात 25,000 रुपयांपर्यंतच्या किंमतीत सादर केला जाऊ शकतो. कारण याआधी असलेला iQOO Z6 5G स्मार्टफोन 23,990 रुपयांमध्ये सादर केला गेला आहे. तसेच लवकरच हा फोन भारतीयांच्या भेटीला येऊ शकतो.  

iQOO Z6 5G चे स्पेसिफिकेशन्स 

iQOO Z6 5G स्मार्टफोन 6.58-इंचाच्या FHD+ डिस्प्लेसह सादर करण्यात आला आहे. जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 240Hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. कंपनीनं यात Panda Glass ची सुरक्षा दिली आहे. हा फोन अँड्रॉइड 12  बेस्ड फनटच ओएस 12 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी Qualcomm Snapdragon 695 चिपसेट आणि Adreno 619 GPU मिळतो. सोबत 8GB पर्यंत RAM आणि 128GB स्टोरेज देण्यात आली आहे. जी मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 1TB पर्यंत वाढवता येते.  

iQOO Z6 5G स्मार्टफोनमध्ये साईड फिंगरप्रिंट सेन्सरसह बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्स मिळतात. यात पावर बॅकअपसाठी 5,000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. iQOO Z6 स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनचा प्रायमरी कॅमेरा 50MP चा आहे. त्याचबरोबर 2MP चा मॅक्रो कॅमेरा आणि 2MP ची पोर्टेट लेन्स दिला मिळते. फ्रंटला 16MP चा सेल्फी शुटर आहे.   

Web Title: iQOO Z6 Pro 5G Price In India Revealed May Launch With Snapdragon 778G SoC 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.