खिशात पैसे नाहीत? तरीही करा रेल्वे तिकीट बुक, जाणून घ्या सोप्पी पद्धत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2022 07:10 PM2022-03-04T19:10:03+5:302022-03-05T11:16:25+5:30
कॅशलेस प्रवासाला भारतीय रेल्वेकडून प्रोत्साहन दिलं जात आहे म्हणूनच ATVM वर तिकीट बुक करण्यासाठी नवीन पर्याय देण्यात आला आहे.
लोकांना सहज रेल्वे तिकीट मिळावं म्हणून देशभरातील रेल्वे स्टेशन्सवर ATVM इन्स्टॉल करण्यात आले आहेत. आता Paytm या तिकीट वेंडिंग मशिन्सच्या माध्यमातून डिजिटल तिकीटिंग सेवा देण्यासाठी IRCTC सह भागेदारी केली आहे. यातून कॅशलेस प्रवासाला प्रोत्साहन मिळेल. या भागेदारीतून ATVM वर UPI च्या माध्यमातून तिकिटासाठी पेमेंट करण्याचं फिचर लाईव्ह करण्यात आलं आहे.
या फिचरच्या माध्यमातून तिकीटिंग Kiosk वर डिजिटल पेमेंट करण्याचा पर्याय मिळेल. पेटीएममधून पेमेंट करताना देखील फक्त युपीआयचा पर्याय नसेल तर पेटीएम वॉलेट, पेटीएम पोस्टपेड नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डचा पर्यायही मिळेल. याआधी फक्त स्मार्ट कार्डचा पर्याय उपलब्ध आहेत. प्रवाशी स्क्रीनवरील QR Code स्कॅन करून अनारक्षित रेल्वे तिकीट, प्लॅटफॉर्म तिकीट आणि सीजनल तिकीट मिळवू शकतील. तसेच स्मार्ट कार्ड रिचार्ज करण्याचा पर्याय देखील देण्यात येईल.
डिजिटल पेमेंटकडून ATVM वर तिकीट कशी बुक करावी
ATVM वर तिकीट बुकिंगसाठी डेस्टिनेशनची निवड करा. तुमच्या स्मार्ट कार्डचा रिचार्ज करायचा असल्यास कार्डचा नंबर नोंदवा. त्यानंतर पेमेंटसाठी पेटीएमचा पर्याय निवडल्यावर QR Code येईल. तो क्युआर कोड स्कॅन करून पेमेंट कन्फर्म करा म्हणजे तुमचं तिकीट जनरेट होईल आणि स्मार्ट कार्ड रिचार्ज देखील होईल.
हे देखील वाचा:
- बाजूला व्हा! 6,599 रुपयांमध्ये आला जबरदस्त स्वदेशी स्मार्टफोन, चिनी कंपन्यांच्या अडचणीत वाढ
- भन्नाट टच स्क्रीन लॅपटॉप! कमी किंमतीत मोठा डिस्प्ले, डिटॅचेबल कीबोर्ड आणि स्टायलस सपोर्ट
- Samsung बाजारपेठेत उडवणार खळबळ; 20 हजारांच्या बजेटमध्ये येतोय अॅडव्हान्स फीचर्स असलेला फोन