IRCTC ची नवीन AI सर्व्हिस, रेल्वे तिकीट बुक करणे झाले सोपे, आता बोलून होणार प्रत्येक काम

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2024 12:00 PM2024-09-05T12:00:22+5:302024-09-05T12:03:58+5:30

IRCTC चा व्हर्च्युअल व्हॉईस असिस्टंट AskDISHA अपग्रेड करण्यात आला आहे आणि त्यात जनरेटिव्ह AI बेस्ड फीचर्स जोडण्यात आली आहेत.

irctc train ticket booking ai voice based service launched for railway reservation | IRCTC ची नवीन AI सर्व्हिस, रेल्वे तिकीट बुक करणे झाले सोपे, आता बोलून होणार प्रत्येक काम

IRCTC ची नवीन AI सर्व्हिस, रेल्वे तिकीट बुक करणे झाले सोपे, आता बोलून होणार प्रत्येक काम

नवी दिल्ली : आयआरसीटीसीने (IRCTC) देशातील लाखो रेल्वे प्रवाशांसाठी तिकीट बुकिंग सुलभ केले आहे. आता टाइप न करता आणि लाइनमध्ये उभे न राहता रेल्वे रिझर्व्हेशन करता येणार आहे. इतकंच नाही तर यूजर्स IRCTC द्वारे बोलून ऑनलाइन पेमेंट देखील करू शकतील. यासाठी भारतीय रेल्वेच्या तिकीट बुकिंग प्लॅटफॉर्मने NPCI सोबत भागीदारी केली आहे. IRCTC चा व्हर्च्युअल व्हॉईस असिस्टंट AskDISHA अपग्रेड करण्यात आला आहे आणि त्यात जनरेटिव्ह AI बेस्ड फीचर्स जोडण्यात आली आहेत.

IRCTC, NPCI आणि CoRover यांनी अलीकडेच UPI पेमेंटसाठी कन्व्हर्सेशनल व्हॉइस पेमेंट सर्व्हिस सुरू केली आहे. भारतीय रेल्वेने ही नवीन पेमेंट गेटवे सर्व्हिस आपल्या IRCTC प्लॅटफॉर्मसह इंटिग्रेट केली आहे. रेल्वे तिकीट बुक करण्यासाठी, प्रवासी आपला UPI आयडी किंवा मोबाईल नंबर टाकून पेमेंट करू शकतील. एवढेच नाही तर प्रवाशांना आता बोलून देखील तिकीट बुक करता येणार आहे. तसेच भारतीय रेल्वेच्या तिकीट बुकिंग प्लॅटफॉर्मवर कॅन्सलेशन, पीएनआर स्टेटस आदींची माहितीही मिळू शकणार आहे.

दरम्यान, IRCTC ची ही नवीन सेवा AI बेस्ड आहे. भारतीय रेल्वेने AI व्हर्च्युअल असिस्टंट AskDISHA ला नवीन फीचर्ससह सुसज्ज केले आहे. तुम्ही IRCTC वेबसाइट किंवा ॲपवर AskDISHA ची मदत घेताच, ते तुम्हाला तुमच्या व्हॉइस कमांडद्वारे तिकीट बुक करण्याचा किंवा रद्द करण्याचा ऑप्शन देईल. तिकीट बुक करण्यासाठी, बोर्डिंग आणि डेस्टिनेशन स्टेशन, ट्रेन नंबर, प्रवासाची तारीख, प्रवाशांची नावे इत्यादी माहिती भरल्यानंतर कन्व्हर्सेशनल UPI पेमेंटचा ऑप्शन निवडा.

तुमच्या व्हॉईस कमांडवरील डिफॉल्ट UPI आयडीद्वारे तिकीट बुकिंगसाठी पेमेंट केले जाईल. ही सिस्टम सुरक्षित करण्यासाठी, भारतीय रेल्वेने CoRover चा व्हॉइस इनेबल्ड Bharat GPT पेमेंट गेटवे वापरला आहे. प्रवाशांसाठी कन्व्हर्सेशनल प्रक्रिया सुलभ करण्यासाठी, पेमेंट गेटवे API वापरण्यात आला आहे. युजर्स IRCTC च्या वेबसाइट आणि ॲपवर या चॅटबॉटला अॅक्सेस करू शकतील. दरम्यान, IRCTC ची ही नवीन सिस्टम अतिशय सोपी आणि जलद आहे. युजर्स फक्त आपला आवाज वापरून तिकीट बुकिंगची सुविधा घेऊ शकतील. येत्या काळात या सिस्टममध्ये आणखी सुधारणा होऊ शकते.

Web Title: irctc train ticket booking ai voice based service launched for railway reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.