‘आयफोन’मुळे आरोग्याला खरंच धोका आहे का ?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2023 10:20 AM2023-09-24T10:20:03+5:302023-09-24T10:20:52+5:30

फ्रान्सने ‘आयफोन 12’च्या विक्रीवर बंदी आणलीय, त्याबाबत...

Is the iPhone really dangerous to health? | ‘आयफोन’मुळे आरोग्याला खरंच धोका आहे का ?

‘आयफोन’मुळे आरोग्याला खरंच धोका आहे का ?

googlenewsNext

पवन देशपांडे 
सहायक  संपादक  
आम्ही कधी विचार केलाय का? ज्या मोबाइलवर आपली दिवस-रात्र नजर असते, तो मोबाइल आपल्या आरोग्यासाठी धोकादायक असू शकतो... त्यातून किती रेडिएशन बाहेर येते आणि त्याचा खरंच आपल्याला धोका आहे का? तुम्ही केला नसेलही; पण अनेक संस्था/संघटना या रेडिएशनविरोधात लढत आहेत आणि त्यावर लक्ष ठेवून आहेत.

एखादी मोबाइल कंपनी जरा कुठे मर्यादेच्या बाहेर गेली, की लगेच त्याविरोधात ओरड सुरू होते. नुकतेच फ्रान्समध्येही असेच काही घडले. दोन-तीन दिवसांपूर्वी ‘ॲपल’ने ‘आयफोन १५’ लॉन्च केला आणि त्याच दिवशी फ्रान्समध्ये ‘ॲपल’च्या ‘आयफोन १२’ या फोनच्या विक्रीवर तेथील सरकारने बंदी आणली. का? तर त्यातून होणाऱ्या रेडिएशनमुळे. फ्रान्स सरकारचे म्हणणे आहे की, ‘आयफोन १२’ हे मॉडेल अधिक रेडिएशन उत्सर्जित करते. ते सरकारने दिलेल्या मानकांनुसार नाही. त्यामुळे ‘आयफोन १२’ फ्रान्समध्ये विकता येणार नाहीत. 

गेल्या तीन-चार वर्षांपासून हा फोन जगभरात विकला जातोय, मग आताच कसा रेडिएशनचा धोका निर्माण झाला, असा सवालही आहे. फ्रान्स सरकारने अचानक १४० मोबाइलच्या रेडिएशनची चाचणी घेतली. ‘आयफोन १२’च्या दोन मॉडेलमध्ये ४० टक्क्यांपेक्षा अधिक रेडिएशन आढळले. युरोपियन युनियनच्या मानकांनुसार, रेडिएशनची मर्यादा प्रतिकिलो चार वॉटच्या आत हवी. ‘आयफोन १२’मध्ये ती ५.७४ एवढी होती. त्यामुळे ते धोक्याचे असल्याचे सरकारने म्हटले आहे.

तिथेच बंदी का?  
रेडिएशनबाबत युरोपियन युनियन आणि जागतिक मानकामध्ये तफावत आहे. जागतिक मर्यादेपेक्षा युरोपियन युनियनमध्ये कमी मर्यादा आहे. त्यामुळे तिथे कमी रेडिएशन ठेवावे लागते. आता फ्रान्स सरकारच्या घोषणेनुसार ‘ॲपल’ला तिथल्या मानकांनुसार विक्री करावी लागेल, अन्यथा त्यांच्या विक्रीवर परिणाम झाला असता.

‘ॲपल’ची विक्री घटेल? 
nतूर्तास ‘ॲपल’च्या विक्रीवर काही परिणाम होईल, असे दिसत नाही. कारण त्यांनी सॉफ्टवेअरमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. 
n‘आयफोन’चे नवा मॉडेल लॉन्च झाल्यानंतर जुन्या मॉडेलच्या किमती कमी होत आहेत. त्यामुळे कदाचित रेडिएशनची ही टूम नव्या मॉडेलच्या विक्रीसाठी तर नसेल? 

रेडिएशनमुळे खरंच धोका?  
मोबाइलमधल्या रेडिएशनमुळे कुणाला धोका निर्माण झाल्याचे आजवर आढळले नाही. जागतिक आरोग्य संघटनेचेही तेच म्हणणे आहे. 

‘ॲपल’चे म्हणणे काय? 
‘ॲपल’ने म्हटले होते की, आंतरराष्ट्रीय मानकांनुसार ‘आयफोन १२’ योग्य आहे. २०२० मध्ये हा फोन लॉन्च केला आणि २०२१ मध्ये फ्रान्सच्याच रेडिएशन चाचणीमध्येही पास झाला होता. त्यामुळे आता यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून फायदा नाही. 
पण ‘ॲपल’ला फ्रान्समध्येच काय, पूर्ण युरोपात जरी फोन विकायचा असेल, तर युरोपीय महासंघाच्या मानकांनुसारच त्यांना बदल करावे लागतील. ॲपल त्यासाठी तयार झाल्याचेही वृत्त होते. त्यासाठी सॉफ्टवेअरमध्ये बदल करून रेडिएशन पातळी कमी करणार आहेत.

Web Title: Is the iPhone really dangerous to health?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.