Xiaomi च्या मोबाईलवर मिळणार ISRO चे तंत्रज्ञान; गुगलला मोठा धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2020 12:00 PM2020-02-26T12:00:38+5:302020-02-26T12:18:54+5:30
भारतात कमालीचा लोकप्रिय झालेला स्मार्टफोन आणि स्मार्ट टीव्ही ब्रँड Xiaomi ने मोठी घोषणा केली आहे. यासाठी क्वालकॉम स्नॅपड्रॅगनने मदत केली आहे.
नवी दिल्ली : भारतात कमालीचा लोकप्रिय झालेला स्मार्टफोन आणि स्मार्ट टीव्ही ब्रँड Xiaomi ने मोठी घोषणा केली आहे. आता यापुढे इस्रोचे तंत्रज्ञान मोबाईलमध्ये वापरणार आहे. यामुळे मेक इन इंडियाला मोठी चालना मिळणार आहे.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने खास भारतासाठी NavIC ही नेव्हिगेशन सिस्टिम बनविली आहे. या प्रणालीद्वारे जियो पोझिशनिंग सिस्टिम (जीपीएस) अगदी अचूक दाखविली जाणार आहे. या जीपीएसची अचुकता एवढी आहे की, भारत आणि मुख्य भूभागाच्या 1500 किमी परिघामध्ये कोणतीही जागा अचूक दाखविली जाणार आहे.
क्वालकॉमने या तंत्रज्ञानाला स्नॅपड्रॅगन प्लॅटफ़ॉर्मवर वापरायला सुरूवात केली आहे. Xiaomi ने सांगितले की हे तंत्रज्ञान लवकरात लवकर सर्व स्मार्टफोनवर उपलब्ध केले जाणार आहे. 2020 मध्ये येणाऱ्या सर्व फोनमध्ये हे तंत्रज्ञान असेल. कंपनीने सांगितले की क्वालकॉम आणि इस्रोने प्रयत्न केल्याने हे शक्य झाले आहे. मेक इन इंडियाला चालना देण्यासाठी हे महत्वाचे असल्याचे कंपनीने सांगितले.
भारतात फेल झालेल्या कंपनीच्या कारमधून डोनाल्ड ट्रम्प फिरतात; ताफ्यातही घेऊन मिरवतात
स्मार्टफोन निर्माती कंपनी इस्रोसोबत काम करत असल्याची ही पहिली वेळ आहे. NavIC मध्ये सात सॅटेलाईट आहेत. यातील तीन हिंदी महासागरावर तर ४ जियो सिंक्रोनस ऑर्बिटमध्ये आहेत. यामुळे ते एखाद्या ठिकाणाची 20 मीटरपेक्षा कमी अंतरावर लोकेशन दाखवितात. इस्रोच्या या तंत्रज्ञानामुळे गुगलला मोठा धक्का बसणार आहे. भारतात सर्वाधिक गुगल मॅप वापरला जातो.
'भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे'; मुकेश अंबानींना डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे आश्वासन
इस्रोचे अध्यक्ष डॉ. के शिवन म्हणाले की, विकासासाठी नेव्हिक वापरणे ही एक महत्त्वाचा टप्पा आहे. यामुळे लोकांच्या दैनंदिन गोष्टी सुलभ होऊ शकतात. 2020 मध्ये शाओमी हे तंत्रज्ञान आपल्या डिव्हाइसमध्ये उपलब्ध करून देईल. याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.