नव्या iPhone 15 Pro मॉडेलसोबत ISRO चे कनेक्शन! तुम्हालाही जाणून अभिमान वाटेल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2023 04:21 PM2023-09-15T16:21:04+5:302023-09-15T16:21:26+5:30

Apple ने iPhone 15 सिरीज लाँच केली आहे. या मालिकेत आयफोन 15 प्रो आणि 15 प्रो मॅक्स मॉडेलचाही समावेश आहे.

ISRO's connection with the new iPhone 15 Pro model! You too will be proud to know | नव्या iPhone 15 Pro मॉडेलसोबत ISRO चे कनेक्शन! तुम्हालाही जाणून अभिमान वाटेल

नव्या iPhone 15 Pro मॉडेलसोबत ISRO चे कनेक्शन! तुम्हालाही जाणून अभिमान वाटेल

googlenewsNext

Apple ने iPhone 15 सिरीज लाँच केली. या मॉडेलची जगभरात चर्चा झाली. या मॉडेलसोबत आपल्या ISRO चे कनेक्शन आहे. Apple ने iPhone 15 Pro मॉडेल्ससाठी भारताचा GPS पर्याय NavIC जोडला आहे. NavIC हे इस्रोनेच विकसित केले आहे. हे नेव्हिगेशन सपोर्ट देते जे यूएस सरकारद्वारे संचालित ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम (GPS) ची भारतीय व्हर्जन आहे.

गुगलने तुमचा पाठलाग करून अब्जावधी कमावले, आता दणका बसलाच; 7000 कोटी मोजावे लागणार

NavIC ने यापूर्वी Qualcomm सोबत हे नेव्हिगेशन तंत्रज्ञान मोबाईल चिपसेटवर जोडण्‍यासाठी काम केले होते. आता ISRO ने Apple सोबत नवीन A17 Pro चिपसेटवर काम केले आणि iPhone 15 Pro आणि 15 Pro Max मध्ये NavIC ला इंटीग्रीटेड केले. जेव्हा तुम्ही Apple च्या साइटवर iPhone 15 Pro मॉडेल्सची फिचर पाहता. तेव्हा तुम्हाला GPS, GLONASS, Galileo, QZSS, BeiDou आणि NavIC दिसेल.

NavIC प्रणाली सध्या iPhone 15 आणि iPhone 15 Plus मॉडेल्समध्ये जोडलेली नाही. ISRO चा GPS पर्यायी NavIC Xiaomi च्या Mi 11X, 11T Pro, OnePlus Nord 2T आणि Realme 9 Pro सारख्या स्मार्टफोनवर देखील आहे.

NavIC दोन्ही प्रकारच्या ठिकाणी सेवा पुरवते. एक मानक पोझिशनिंग सेवा आहे आणि दुसरी सुरक्षा एजन्सी आणि लष्करी प्रवेशासाठी एनक्रिप्टेड सेवा आहे. NavIC प्रणाली 7 उपग्रहांवर अवलंबून आहे, त्यापैकी 3 जिओस्टेशनरी अर्थ ऑर्बिट (GEO) उपग्रह आहेत आणि 4 जिओसिंक्रोनस ऑर्बिट (GSO) उपग्रह आहेत.

Web Title: ISRO's connection with the new iPhone 15 Pro model! You too will be proud to know

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.