कर्मचारी कपातीनंतरही IT मध्ये फ्रेशर्सना मिळतेय लाखोंचे पॅकेज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2023 01:18 PM2023-06-13T13:18:35+5:302023-06-13T13:19:22+5:30

नवपदवीधरांची सर्वाधिक २१ टक्के भरती होण्याची शक्यता

IT freshers getting annual packages worth lakhs of rupees Even after the layoffs | कर्मचारी कपातीनंतरही IT मध्ये फ्रेशर्सना मिळतेय लाखोंचे पॅकेज

कर्मचारी कपातीनंतरही IT मध्ये फ्रेशर्सना मिळतेय लाखोंचे पॅकेज

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: मंदीच्या शक्यतेमुळे बहुतांश कंपन्या कर्मचारी कपात करीत आहेत. यामुळे नोकऱ्यांत घट होण्याची शक्यता आहे. परंतु आयटी कंपन्या या स्थितीतही नवपदवीधरांना सर्वाधिक पॅकेज देत आहेत. रॅण्डस्टॅण्ड इंडिया व फाउंडइट यांच्या अहवालानुसार, आयटीत नवपदवीधरांची सर्वाधिक २१ टक्के भरती होण्याची शक्यता आहे.

४ लाख नोकऱ्या आयटीत

नवपदवीधरांना आयटी क्षेत्रात ६० टक्के नोकऱ्या मिळतील, असे रॅण्डस्टॅण्ड इंडियाच्या अहवालात म्हटले आहे. १५ लाख इंजिनिअरिंगचे पदवीधर भारतात दरवर्षी तयार होतात. यातील १०,६०० आयटी क्षेत्रातील असतात.

फ्रेशर्सना किती पॅकेज?

क्षेत्र     (वार्षिक सरासरी लाख रुपयांत)

  • आयटी-सॉफ्टवेअर    ४.३६ ते ८.०८
  • एअरलाइन्स    ४.२५ ते ७.३६ 
  • इंटरनेट-ई-काॅमर्स    ३.९३ ते ६.५३ 
  • एनर्जी-ऑइल    ३.३३ ते ५.७६ 
  • टेलिकॉम    २.८३ ते ४.८० 
  • बीपीओ     २.२९ ते ४.२६ 
  • रिक्रुटमेंट- स्टाफिंग     २.१४ ते ४.२२


कोणत्या क्षेत्रात किती संधी?

  • २१.५% - रिक्रुटमेंट-स्टाफिंग
  • २१% - आयटी-सॉफ्टवेअर
  • १०% - बीपीओ आयटीईएस
  • ०६% - बिझनेस-फायनान्स
  • ०५% - एज्युकेशन
  • ३६.५% - अन्य

Web Title: IT freshers getting annual packages worth lakhs of rupees Even after the layoffs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.