खुशखबर! फिचर फोनच्या किंमतीत 4G स्मार्टफोन; देणार का JioPhone Next ला टक्कर?  

By सिद्धेश जाधव | Published: August 5, 2021 07:05 PM2021-08-05T19:05:05+5:302021-08-05T19:07:27+5:30

Cheapest 4G Smartphone In India: भारतातील सर्वात स्वस्त 4G स्मार्टफोन Itel A23 नॉचलेस डिस्प्लेसह सादर करण्यात आला आहे. यात जुन्या स्मार्टफोन्सप्रमाणे चारही बाजूंनी जाड बेजल्स आहेत.

Itel a23 jio at rs 3799 is cheapest 4g smartphone availble in india   | खुशखबर! फिचर फोनच्या किंमतीत 4G स्मार्टफोन; देणार का JioPhone Next ला टक्कर?  

खुशखबर! फिचर फोनच्या किंमतीत 4G स्मार्टफोन; देणार का JioPhone Next ला टक्कर?  

Next

रिलायन्स जियोने जूनमध्ये आपल्या किफायतशीर 4G स्मार्टफोनची घोषणा केली होती. JioPhone Next सप्टेंबरमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. जियोने या स्मार्टफोनच्या किंमतीची माहिती दिली नाही परंतु हा जगातील सर्वात स्वस्त 4G स्मार्टफोन असेल असा कंपनीने सांगितले आहे. परंतु तुम्हाला सध्या भारतात उपलब्ध असलेला सर्वात स्वस्त 4G SmartPhone माहित आहे का? Itel A23 स्मार्टफोन भारतात फक्त 3,799 रुपयांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. 

Itel A23 ची डिजाईन  

भारतातील सर्वात स्वस्त 4G स्मार्टफोन Itel A23 नॉचलेस डिस्प्लेसह सादर करण्यात आला आहे. यात जुन्या स्मार्टफोन्सप्रमाणे चारही बाजूंनी जाड बेजल्स आहेत. या डिस्प्लेच्या खालच्या बाजूला टच नेविगेशन, वरच्या बाजूला फ्रंट फ्लॅशसह सेल्फी कॅमेरा आणि स्पिकर देण्यात आला आहे. Itel A23 च्या मागे एक रियर कॅमेरा आहे. फोनच्या उजव्या पॅनलवर वॉल्यूम रॉकर आणि पावर बटण आहे. 

Itel A23 चे स्पेसिफिकेशन्स  

आयटेल ए23 स्मार्टफोनमध्ये 5 इंचाचा डिस्प्ले आहे. हा 854x480 पिक्सल रिजोल्यूशन असलेला आयपीएस डिस्प्ले आहे. प्रोसेसिंगसाठी Itel A23 4G मध्ये 1.4गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेला 64बिट क्वॉडकोर प्रोसेसर देण्यात आला आहे जो UNISOC Spreadtrum SC9832E चिपसेटवर चालतो. ग्राफिक्ससाठी या फोनमध्ये ARM Mali-T820 MP1 जीपीयू देण्यात आला आहे. हा 1GB रॅम आणि 8GB इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. Itel A23 स्मार्टफोन अँड्रॉइड ओरियो 8.1 ओएसच्या Go Edition वर चालतो.  

फोटोग्राफीसाठी आयटेल ए23 स्मार्टफोनमध्ये एलईडी फ्लॅशसह 2 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला हे. या स्मार्टफोनमध्ये फ्रंटला देखील फ्लॅश आहे, सोबत वीजीए फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. Itel A23 चा फ्रंट कॅमेरा फेस अनलॉक फीचरसह येतो. पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 2,400एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.  

Web Title: Itel a23 jio at rs 3799 is cheapest 4g smartphone availble in india  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.