Reliance Jio आणि Itel चा धमाका; ३८९९ रूपयांच्या फोनवर मिळतोय ३ हजार रूपयांचा फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2021 06:18 PM2021-05-27T18:18:47+5:302021-05-27T18:19:37+5:30

Reliance Jio Itel : ग्राहकांना मिळणार ३ रूपयांचा फायदा. या स्मार्टफोनमध्ये मिळणार 4G सपोर्टही.

itel A23 Pro 4G smartphone to be available for rupees 3899 for Jio users | Reliance Jio आणि Itel चा धमाका; ३८९९ रूपयांच्या फोनवर मिळतोय ३ हजार रूपयांचा फायदा

Reliance Jio आणि Itel चा धमाका; ३८९९ रूपयांच्या फोनवर मिळतोय ३ हजार रूपयांचा फायदा

googlenewsNext
ठळक मुद्देग्राहकांना मिळणार ३ रूपयांचा फायदा.या स्मार्टफोनमध्ये मिळणार 4G सपोर्टही.

स्वस्त दरात स्मार्टफोन उत्पादन करणारी कंपनी Itel आणि रिलायन्स जिओ (Reliance Jio) यांनी एकत्र येत A23 Pro 4G हा स्मार्टफोन खरेदी करण्याची सुवर्णसंधी दिली आहे. या स्मार्टफोनची सुरूवातीला किंमत 4,999 रूपये होती. परंतु विशेष ऑफर अंतर्गत हा स्मार्टफोन केवळ 3,899 रूपयांना मिळणार आहे. यासोबतच ग्राहकांना ३ हजार रूपयांचे रिचार्ज बेनिफिट्सही देण्यात येणार आहेत.

हा स्मार्टफोन विकत घेणाऱ्या ग्राहकांना 3 हजार रूपयांचं रिचार्ज बेनिफिट हे युझर्सला व्हाऊचर्सच्या रूपात मिळणार आहे. युझरला आपल्या जिओ क्रमांकावर 249 किंवा त्यापेक्षा अधिकच्या प्लॅनचं रिचार्ज करावं लागेल. A23 Pro 4G या स्मार्टफोनचा सेल १ जूनपासून सुरू होणार आहे. हा स्मार्टफोन रिलायन्स डिजिटल स्टोअर, MyJio Store आणि Reliancedigital.in यावरून खरेदी करता येऊ शकतो.

काय आहेत स्पेसिफिकेशन्स?

या एन्ट्री लेव्हल स्मार्टफोनमध्ये 480x854 पिक्सेल रिझॉल्युशनसह 5 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये 1 जीबी रॅम आणि 8 जीबी इंटरनल स्टोरेजही देण्यात आलं आहे. तसंच यात 1.4Ghz SC9832E क्वॉड कोअर प्रोसेसर मिळेल. तसंच गरज भासल्यास यामध्ये 32 जीबीपर्यंत एसडी कार्डच्या माध्यमातून मेमरीही वाढवता येईल. या स्मार्टफोनच्या मागील बाजूला 2 मेगापिक्सेलचा तर पुढील बाजूला VGA कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय यात 2400mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. याशिवाय या स्मार्टफोनमध्ये 4G VoLTE/VoLTE सोबत ड्युअल सिम सपोर्टही देण्यात आला आहे. 
 

Web Title: itel A23 Pro 4G smartphone to be available for rupees 3899 for Jio users

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.