6000 पेक्षा कमीमध्ये आला नवीन Smartphone; पावरफुल बॅटरी आणि जबरदस्त फीचर्स
By सिद्धेश जाधव | Published: February 15, 2022 08:26 PM2022-02-15T20:26:01+5:302022-02-15T20:28:13+5:30
iTel A27 Smartphone: iTel A27 स्मार्टफोन भारतात अँड्रॉइड 10 गो एडिशनसह सादर झाला आहे. सोबत 2GB RAM आणि 32 GB स्टोरेज देण्यात आली आहे.
itel आपल्या बजेट स्मार्टफोन्स पोर्टफोलियोचा विस्तार केला आहे. हा फोन भारतीयांच्या भेटीला Itel A27 नावानं लाँच झाला आहे. या फोनमध्ये एआय पावर ड्युअल कॅमेऱ्यासह 4000mAh ची पॉवरफुल बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी तासांचा 20 टॉक-टाइम देते, असा दावा कंपनीनं केला आहे. चला जाणून घेऊया या फोनचे सर्व स्पेसिफिकेशन्स आणि किंमत.
itel A27 ची किंमत
Itel A27 ची किंमत भारतात 5,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन 2 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. हा फोन Crystal Blue, Silver Purple आणि Deep Grey कलरमध्ये विकत घेता येईल. हा फोन विकत घेतल्यावर 100 दिवसांची वन-टाइम स्क्रीन रिप्लेसमेंट अगदी मोफत देण्याची घोषणा कंपनीनं केली आहे.
itel A27 चे स्पेसिफिकेशन
यात 6.45 इंचाचा मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे. हा क्वॉड कोर प्रोसेसरसह बाजारात आला आहे. हा फोन Android 10 (Go Edition) वर चालतो. फोनमध्ये 2 जीबी रॅमसह 32 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. डिवाइसच्या बॅक पॅनलवर ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 5 मेगापिक्सलचा AI सेन्सर मिळतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फ्रंटला 2 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी मिळते, ही बॅटरी 20 तासांचा टॉक-टाइम देते.
हे देखील वाचा:
- आताच खरेदी करून ठेवा ‘हे’ गॅजेट्स; लवकरच बदलणार Smartphone पासून Refrigerator च्या किंमती
- संधी सोडू नका! Samsung च्या 32-इंचाच्या Smart TV वर सर्वात मोठा डिस्काउंट, अशी आहे अॅमेझॉनची ऑफर