फक्त 6,500 रुपयांमध्ये आला दमदार स्मार्टफोन; जियोफोन नेक्स्टला आसमान दाखवणार?
By सिद्धेश जाधव | Published: March 14, 2022 08:07 PM2022-03-14T20:07:25+5:302022-03-14T20:07:32+5:30
iTel A49 हा एंट्री लेव्हल स्मार्टफोन 2GB RAM, 128GB स्टोरेज, 5MP कॅमेरा आणि 4000mAh बॅटरीसह लाँच झाला आहे.
iTel ब्रँड अंतर्गत नवीन बजेट स्मार्टफोन सादर झाला आहे. या फोनची किंमत कंपनीनं 6,499 रुपये ठेवली आहे. या किंमतीत हा फोन जियोफोन नेक्स्टला चांगली टक्कर देऊ शकतो. हा एंट्री लेव्हल स्मार्टफोन 2GB RAM, 128GB स्टोरेज, 5MP कॅमेरा आणि 4000mAh बॅटरीसह लाँच झाला आहे. चला जाणून घेऊया या नव्या एंट्री लेव्हल स्मार्टफोन iTel A49 चे स्पेसिफिकेशन्स.
iTel A49 चे स्पेसिफिकेशन्स
iTel A49 फोनमध्ये कंपनीनं 6.6 इंचाचा एचडी+ आयपीएस डिस्प्ले दिला आहे. हा एक वॉटरड्रॉप नॉच डिजाईन असलेला डिस्प्ले आहे. हा फोन अँड्रॉइड 11 गो एडिशनवर चालतो, त्यामुळे कमी रॅम आणि स्टोरेज देखील कमी पडत नाहीत. यात प्रोसेसिंगसाठी क्वॉड कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. सोबत 2 जीबी रॅम आणि 32 जीबी इंटरनल स्टोरेज मिळते. जी 128 जीबी पर्यंत मायक्रोएसडी कार्डनं वाढवता येते.
या फोनमध्ये फोटोग्राफीसाठी ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात एलईडी फ्लॅशसह 5 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि एक AI कॅमेरा आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. पावर बॅकअपसाठी यात 4000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन फास्ट फेस अनलॉक आणि मल्टी-फीचर फिंगरप्रिंट सेन्सरला सपोर्ट करतो. आयटेलचा हा नवीन फोन क्रिस्टल पर्पल, डोम ब्लू आणि स्काय स्यान कलर ऑप्शनमध्ये विकत घेता येतो.
हे देखील वाचा:
- अशाप्रकारे जिंका Ludo King चा प्रत्येक गेम, फॉलो करा सोप्प्या टिप्स
- 21 हजारांचा डिस्काउंट! 12GB RAM असलेला ‘या’ शक्तिशाली Oppo फोनवर मिळतेय बंपर सूट
- Samsung च्या 'या' स्टोरमध्ये फक्त महिला कमर्चारी विकणार मोबाईल, कंपनीनं सुरु केला नवीन ग्रुप