आयटेलचा 'एआय'वाला ए९५ स्मार्टफोन लाँच; १०,००० च्या आत किंमत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 20:49 IST2025-04-17T20:48:41+5:302025-04-17T20:49:11+5:30

आयटेल या परवडणाऱ्या किंमतीत मोबाईल आणणाऱ्या कंपनीचा नवा फाईव्ह जी स्मार्टफोन आज लाँच झाला आहे.

Itel A95 5G Marathi news: Itel launches A95 smartphone with AI; Priced under Rs 10,000... | आयटेलचा 'एआय'वाला ए९५ स्मार्टफोन लाँच; १०,००० च्या आत किंमत...

आयटेलचा 'एआय'वाला ए९५ स्मार्टफोन लाँच; १०,००० च्या आत किंमत...

आयटेल या परवडणाऱ्या किंमतीत मोबाईल आणणाऱ्या कंपनीचा नवा फाईव्ह जी स्मार्टफोन आज लाँच झाला आहे. Itel A95 5G असे या फोनचे नाव असून तो १०००० रुपयांच्या आता उपलब्ध करण्यात आला आहे. 

यामध्ये ऑक्टा-कोर MediaTek Dimensity 6300 चिपसेट देण्यात आलेला आहे. तसेच ६ जीबीपर्यंत रॅम देण्यात आली आहे. अँड्रॉईड १४ यात देण्यात आलेली असून ५००० एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. सेल्फीसाठी ८ मेगापिक्सल कॅमेरा, पाठीमागे ५० मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच धूळ आणि पाण्यापासून संरक्षणासाठी IP54 रेटिंग देण्यात आली आहे. 

किंमत...
आयटेल ए ९५ ५जी च्या 4GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 9,599 रुपये आणि 6GB + 128GB व्हेरिएंटची किंमत 9,999 रुपये ठेवण्यात आली आहे. ब्लॅक, गोल्ड आणि मिंट ब्लू रंगाच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. 

मोफत स्क्रीन रिप्लेसमेंट...
या फोनमध्ये महत्वाचे म्हणजे कंपनीने मोफत स्क्रीन रिप्लेसमेंटही दिली आहे. यासाठी फोन घेतल्यापासून १०० दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. 

A95 मध्ये 120Hz रिफ्रेश रेट, 240Hz टच सॅम्पलिंग रेट आणि पांडा ग्लास प्रोटेक्शनसह 6.67-इंचाचा HD+ IPS LCD डिस्प्ले देण्यात आलेला आहे. १० वॅटचा चार्जर देण्यात आला आहे. याफोनमध्ये इन्फ्रारेड सेन्सर देखील देण्यात आला आहे. याद्वारे तुम्ही घरातील एसी, टीव्ही, फॅन आदी उपकरणे हाताळू शकता. याचबरोबर एआय व्हॉइस असिस्टंट आयवाना आणि आस्क एआय टूल्स देण्यात आले आहे. फोनमध्ये डायनॅमिक बार देखील देण्यात आला आहे. साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फीचर देण्यात आले आहे. 

Web Title: Itel A95 5G Marathi news: Itel launches A95 smartphone with AI; Priced under Rs 10,000...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.