धमाकेदार साउंड क्वॉलिटीसह itel चे 4 साउंडबार सादर; जाणून घ्या किंमत
By सिद्धेश जाधव | Published: September 28, 2021 07:40 PM2021-09-28T19:40:04+5:302021-09-28T19:41:24+5:30
itel ने आपल्या ऑडियो प्रोडक्ट पोर्टफोलियोचा विस्तार करत चार साउंडबार भारतात सादर केले आहेत.
itel ने आपल्या ऑडियो प्रोडक्ट पोर्टफोलियोचा विस्तार केला आहे. फेस्टिव्हल सीजनच्या आधी कंपनीने एक-दोन नव्हे तर 4 साउंडबार भारतात सादर केले आहेत. यात itel XE-SB505, itel XE-SB515, XE-SB625 WL, आणि XE-SB1040 WL चा समावेश आहे. डायनॅमिक साउंड आउटपुट देणारे हे साऊंडबार अॅमेझॉनवरून विकत घेता येतील.
itel XE-SB505 साउंडबार
itel XE-SB505 साउंडबार कंपनीचा एंट्री लेव्हल प्रोडक्ट आहे जो 35W साउंड आउटपुट डिलिव्हर करतो. या साउंडबारमध्ये 12.7 cmचा वायर्ड वूफर आणि चार स्पिकर देण्यात आले आहेत. कनेक्टिविटीसाठी Bluetooth, AUX आणि USB असे पर्याय मिळतील. हा साउंडबार फोन, टीव्ही आणि इतर डिवाइसेस कनेक्ट करता येईल, तसेच FM Radio आणि SD Card स्लॉटच्या माध्यमांचा वापर देखील गाणी ऐकण्यासाठी करता येईल. या वुडन फिनिशिंग असलेलया वॉल माउंट साइडबारची किंमत 3,899 रुपये आहे.
itel XE-SB515 साउंडबार
itel XE-SB515 साउंडबारमधील 80W चे स्पिकर क्रिस्टल क्लीयर आउटपुट देतात. तसेच यातील 13.3 cm चा वायर्ड सब वुफर डीप बेससह शानदार साउंड क्वालिटी देऊ शकतो. कनेक्टिविटीसाठी या डिवाइसमध्ये HDMI-ARC, Bluetooth, AUX, USB, Optical Input आणि SD Card स्लॉट असे ऑप्शन्स मिळतात. itel XE-SB515 साउंड बार 6,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल.
itel XE-SB625 WL साउंडबार
itel XE-SB625 WL साउंडबारमध्ये दमदार 120W चे स्पीकर मिळतात. यात 16.5 cm चा वूफर आहे जो स्ट्रॉन्ग बेस ऑफर करतो. हा ब्लूटूथ, HDMI-ARC, AUX आणि USB ने इतर डिवाइसशी कनेक्ट करता येतो. तसेच SD Card चा स्लॉट देखील मिळतो. प्रीमियम मेटॅलिक फिनिशसह येणाऱ्या या साउंडबारची किंमत 7,999 रुपये ठेवण्यात आली आहे.
itel XE-SB1040 WL साउंडबार
itel XE-SB1040 WL साउंड बार या सीरिजमधील हायएंड साउंडबार आहे, जो 170W ऑडियो आउटपुटसह सादर करण्यात आला आहे. हा भारतातील पहिला साउंडबार आहे जो 25.4 cm वायरलेस वूफरसह लाँच झाला आहे, या वायरलेस वूफरने थंपिंग बेस मिळतो. या साउंडबारमध्ये H-ARC, Bluetooth, AUX, USB आणि SD Card स्लॉट मिळतो. याची किंमत 10,999 रुपये आहे.