itel ने भारतात लाँच केले दोन शानदार 4K Smart TV; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
By सिद्धेश जाधव | Published: July 8, 2021 05:12 PM2021-07-08T17:12:01+5:302021-07-08T17:12:59+5:30
Itel 4K Smart TV Price: itel ने लाँच केलेल्या G4334IE मॉडेलचा आकार 43 इंच आणि G5534IE मॉडेलचा आकार 55 इंच आहे. दोन्ही itel स्मार्टटीव्हीसोबत 24W आउटपुट असलेले स्पिकर देण्यात आले आहेत.
itel ने भारतात दोन नवीन 4K अँड्रॉइड स्मार्टटीव्ही लाँच केले आहेत. कंपनीने लाँच केलेल्या G4334IE मॉडेलचा आकार 43 इंच आणि G5534IE मॉडेलचा आकार 55 इंच आहे. आयटेलने सादर केलेल्या या 4K स्मार्ट टीव्हीमध्ये 400 निट्स ब्राईटनेस असलेला डिस्प्ले देण्यात आला आहे. हे टीव्ही Android 10 प्लॅटफॉर्मवर चालतात. तसेच दोन्ही itel स्मार्टटीव्हीसोबत 24W आउटपुट असलेले स्पिकर देण्यात आले आहेत. (Itel launches new 43-inch and 55-inch Smart TVs in India)
itel 4K Smart TV ची किंमत
itel च्या 43 इंच मॉडेलची किंमत 32,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर 55 इंचाचा मॉडेल 46,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.
itel 4K Smart TV चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
आयटेलच्या नवीन 4K अँड्रॉइड स्मार्ट टीव्हीमध्ये 400 निट्स ब्राईटनेस असलेले 4K UHD डिस्प्ले देण्यात आला आहे. त्याचबरोबर दोन्ही टीव्हीमध्ये 24W स्पिकर, लेटेस्ट अँड्रॉइड 10 OS, गुगल असिस्टंट आणि बिल्ट इन क्रोमकास्ट देण्यात आला आहे. या स्मार्टटीव्हीमध्ये मीडियाटेकचा चिपसेट आणि Mali G52 GPU देण्यात आला आहे.
या स्मार्टटीव्हीमध्ये फ्रेमलेस डिजाईन देण्यात आली आहे, त्यामुळे बेजल खूप कमी आहेत. 4K रिजोल्यूशन सोबतच 178 डिग्री व्यूइंग अँगल असलेला डिस्प्ले तुम्हाला कोणत्याही बाजूने टीव्ही बघता येईल. itel स्मार्टटीव्हीमध्ये 2GB रॅम आणि 8GB बिल्ट-इन स्टोरेज देण्यात आली आहे. कनेक्टिविटीसाठी यात वायफाय, HDMI, USB पोर्ट आणि ब्ल्यूटूथ 5.0 चा सपोर्ट देण्यात आला आहे. या स्मार्टटीव्हीवर 5000 पेक्षा जात अॅप्स वापरता येतील. ज्यात नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राइम व्हिडीओ, जी5, डिज्नी प्लस हॉटस्टार, युट्युब इत्यादींचा यूट्यूब आदि शामिल आहेत.