JioPhone टक्कर देईल हा नवीन 4G फीचर फोन; स्वदेशी कंपनीने केली कमाल 

By सिद्धेश जाधव | Published: June 15, 2021 05:43 PM2021-06-15T17:43:12+5:302021-06-15T17:56:07+5:30

Itel Magic 2 4G Launch: Itel Magic 2 4G हा फिचर फोन 2जी, 3जी, 4जी, वाय-फाय आणि ब्लूटूथ सपोर्टसह सादर करण्यात आला आहे.  

itel magic 2 4g feature phone launched in india with 4g capabilities  | JioPhone टक्कर देईल हा नवीन 4G फीचर फोन; स्वदेशी कंपनीने केली कमाल 

JioPhone टक्कर देईल हा नवीन 4G फीचर फोन; स्वदेशी कंपनीने केली कमाल 

googlenewsNext

स्वदेशी कंपनी itel ने किफायतशीर फोन लाँच करण्यासाठी ओळखली जाते. आता कंपनीने आपला पहिला 4G ड्युअल सिम फीचर फोन ‘Magic 2 4G’ भारतीय बाजारात सादर केला आहे. या फोनची थेट टक्कर Jio Phone आणि Jio Phone 2 शी होईल. चला जाणून घेऊया (itel Magic 2 4G Superphone ची माहिती. (itel magic 2 4g feature phone launched in india at Rs 2,349) 

Itel Magic 2 4G चे स्पेसिफिकेशन्स 

मॅजिक 2 4जी मध्ये 2.4 इंचाचा QVGA 3D कर्व्ड डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच, फोनमध्ये फक्त 128MB इंटरनल स्टोरेज आहे. परंतु, तुम्ही 64GB पर्यंतच्या माइक्रोएसडी कार्डचा वापर करू शकता. त्याचबरोबर या फोनमध्ये किंग वॉयस आणि टेक्स्ट टू स्पीच फीचर देण्यात आले आहेत.  

या फोनमध्ये अनेक भारतीय भाषांना सपोर्ट देण्यात आला आहे. डिवाइसमध्ये 2000 कॉन्टॅक्टस साठवून ठेवता येतात. तसेच, यातील 1900mAh ची बॅटरी 24 दिवसांचा स्टॅन्डबाय टाइम देते. फोन 2जी, 3जी, 4जी, वाय-फाय आणि ब्लूटूथला देखील सपोर्ट करतो.  

Itel Magic 2 4G मध्ये फ्लॅशसह 1.3 एमपीचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच, फोनमध्ये रेकॉर्डिंग आणि व्हायरलेस एफएम, ऑटोकॉल रेकॉर्डर, एक मोठी एलईडी टॉर्च, वन-टच म्यूट आणि 8 प्रीलोडेड गेम देण्यात आले आहेत.  

किंमत 

Itel Magic 2 4G ची किंमत 2,349 रुपये आहे, अशी माहिती 91mobiles ने दिली आहे. फोनसोबत 100 दिवसांची रिप्लेसमेंट वॉरंटी, 12 महिन्यांची गॅरंटी आणि वन-टाइम स्क्रीन रिप्लेसमेंट (एक वर्षाच्या आत) मिळते. 

Web Title: itel magic 2 4g feature phone launched in india with 4g capabilities 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.