8,000 रुपयांच्या आत 5,000एमएएच बॅटरीसह iTel S17 लाँच; जाणून घ्या वैशिष्ट्ये 

By सिद्धेश जाधव | Published: October 11, 2021 01:11 PM2021-10-11T13:11:41+5:302021-10-11T13:11:51+5:30

Cheap Android Phone iTel S17 Launch: iTel S17 स्मार्टफोन नायजेरियात कमी किंमतीत सादर करण्यात आला आहे. हा फोन लवकरच भारतीय बाजारात दाखल होऊ शकतो.

iTel S17 Launched with Android 11 Go Edition know specs price sale  | 8,000 रुपयांच्या आत 5,000एमएएच बॅटरीसह iTel S17 लाँच; जाणून घ्या वैशिष्ट्ये 

8,000 रुपयांच्या आत 5,000एमएएच बॅटरीसह iTel S17 लाँच; जाणून घ्या वैशिष्ट्ये 

Next

टेक ब्रँड iTel आपल्या एंट्री लेव्हल (Cheap Android Phone) स्मार्टफोन्ससाठी ओळखली जाते. या ब्रँड अंतर्गत सादर करण्यात आलेल्या फोन्सची किंमत खूपच कमी असते. काही दिवसांपूर्वी iTel A26 स्मार्टफोन फक्त 5,999 रुपयांमध्ये भारतात सादर करण्यात आला होता. आता ब्रँडने आपल्या एस सीरिजमध्ये iTel S17 स्मार्टफोन जागतिक बाजारात सादर केला आहे. चला जाणून घेऊया आयटेल एस17 ची सविस्तर माहिती.  

आयटेल एस17 ची किंमत 

आयटेल एस17 स्मार्टफोन नायजेरियामध्ये फक्त एकाच व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. या फोनची किंमत 45,000 नायजेरियन नायरा ठेवण्यात आली आहे. ही किंमत 8,000 भारतीय रुपयांच्या आसपास रूपांतरित होते. 1GB RAM आणि 16GB स्टोरेज असलेला हा डिवाइस तीन कलरमध्ये विकत घेता येईल. कंपनीच्या इतर फोन्स प्रमाणे हा फोन देखील भारतीय बाजारात दाखल होऊ शकतो.  

आयटेल एस17 चे स्पेसिफिकेशन्स 

आयटेल एस17 मध्ये कंपनीने 6.6 इंचाचा डिस्प्ले दिला आहे. वॉटरड्रॉप नॉच डिजाईनसह सादर करण्यात आलेला हा फोन एचडी+ आयपीएस पॅनलसह बाजारात आला आहे. या फोनमधील चिपसेटची माहिती मिळाली नाही, परंतु यात 1.3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेला क्वॉडकोर प्रोसेसर आहे. हा एक Android 11 Go Edition वर चालणार फोन आहे. त्यामुळे यातील 1GB रॅम दैनंदिन वापरासाठी पुरेसा ठरतो.  

सिक्योरिटीसाठी या फोनच्या बॅक पॅनलवर रियर फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. iTel S17 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात एलईडी फ्लॅशसह 8 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर, 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि 0.3 मेगापिक्सलची एआय लेन्स देण्यात आली आहे. हा फोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. तसेच पॉवर बॅकअपसाठी या डिवाइसमध्ये 5,000एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे.  

Web Title: iTel S17 Launched with Android 11 Go Edition know specs price sale 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.