5G लाँच होऊन दोन महिने होत आले, शोधून शोधून सापडेना; एअरटेल, जिओने उल्लू बनविले?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2022 07:20 PM2022-11-22T19:20:40+5:302022-11-22T19:21:09+5:30

कंपन्यांनी घाई केल्याचे आता ग्राहकवर्गात बोलले जात आहे. अनेकांनी ५जी फोन घेतले आहेत.

It's been two months since 5G launched, but signals will not come; Airtel, Jio made fool? | 5G लाँच होऊन दोन महिने होत आले, शोधून शोधून सापडेना; एअरटेल, जिओने उल्लू बनविले?

5G लाँच होऊन दोन महिने होत आले, शोधून शोधून सापडेना; एअरटेल, जिओने उल्लू बनविले?

googlenewsNext

देशात ५जी लाँच होऊन आता दोन महिने होत आले आहेत. परंतू, ग्राहकांमध्ये आता एअरटेल आणि जिओने फसवल्याची भावना तयार होऊ लागली आहे. एअरटेलने १३ शहरांत तर जिओने ८ शहरांत ५जी नेटवर्क लाँच केल्याचा दावा केला आहे. परंतू, जशी २जी लाँच झालेले तेव्हा लोक रेंज घेत फिरायचे तशी परिस्थिती आता लोकांवर पुन्हा आली आहे. 

मुंबईत जिओने ५जी लाँच केले, परंतू अनेक भागात फिरूनही ५जी सापडलेले नाही. याबाबत जिओला विचारले असता जिओच्या कस्टमर केअरचे उत्तर तुमच्याकडे ५जी फोन असावा, अपडेट असावा आणि ५जी सुरु असलेल्या कव्हरेज म्हणजेच टॉवरच्या क्षेत्रात असावा, अमूक पेक्षा जास्त रिचार्ज हवे, असे सांगितले.

एअरटेलच्या फाईव्ह जीची देखील अशीच अवस्था आहे. दोन्ही कंपन्यांनी शोधुन सापडणार नाही अशा ठिकाणी ५जी सेवा सुरु केली आहे. यामुळे ही यंत्रणा ज्या टॉवरवर बसवली आहे, तिथे राहणाऱ्या, काम करणाऱ्या लोकांना ५जी मिळत आहे. इतर लोक दोन महिने उलटले तरी वाट पाहत आहेत. 

कंपन्यांनी घाई केल्याचे आता ग्राहकवर्गात बोलले जात आहे. अनेकांनी ५जी फोन घेतले आहेत. परंतू ते अपडेट केले, सेटिंग बदलले असले तरी त्यांना ५जी स्पीड सोडा चिन्हही दिसत नाहीय. सुरुवातीला कंपन्यांनी शहरांची नावे, नंबर जाहीर केले होते. या शहरभरात याची सेवा एकाचवेळी सुरु होईल असे वाटले होते. परंतू, कंपन्यांनी ५जी सेवा निवडक ठिकाणी, निवडक लोकांसाठीच सुरु केली आहे. कंपन्यांनी एकेक शहर एकाचवेळी ५जी करायला हवे होते, उगाचच हवा करण्यात आल्याचे अनेक ग्राहकांचे म्हणणे आहे. 

कंपन्यांनी पुढील वर्षाच्या किंवा २०२४ च्या अखेरपर्यंत देशभरात ५जी लाँच केले जाणार असल्याचे जाहीर केले होते. आता देशातही याचप्रमाणे ५जी सेवा सुरु करण्याचा वेग राहिला तर २०२४ उलटला तरी ५जी मिळण्याची शक्यता कमी वाटत आहे. त्यातले त्यात व्होडाफोन आयडियाने काहीच न करून लोकांना कमीतकमी उल्लू तरी बनविले नाही, अशी भावना मोबाईल युजर्समध्ये आहे. 

Web Title: It's been two months since 5G launched, but signals will not come; Airtel, Jio made fool?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :5G५जी