It’s you in the video! असा मेसेज तुम्हाला आलाय का?; काय कराल?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2021 09:46 AM2021-12-16T09:46:20+5:302021-12-16T09:46:48+5:30

तुमच्या फेसबुक मेसेंजरमध्ये एखाद्या माहितीच्या व्यक्तीच्या प्रोफाईलवरून एक लिंक येते. त्यात लिहिलेलं असतं, It’s you in the video!

It’s you in the video! Have you received such a message? : What will you do? | It’s you in the video! असा मेसेज तुम्हाला आलाय का?; काय कराल?

It’s you in the video! असा मेसेज तुम्हाला आलाय का?; काय कराल?

googlenewsNext

आपण तर कुठला व्हिडिओ काढलेला नाहीये, मग, आपण असलेला हा कुठला व्हिडिओ असावा बरं असं वाटून, कुतूहलापोटी,  घाबरून जाऊन, किंवा इतर कुठल्याही कारणाने आपण त्या लिंकवर क्लिक करतो आणि आपण अलगद एका सापळ्यात अडकतो. या लिंकवर क्लिक केलं की, तुमच्या प्रोफाईलवरून इतरांना असाच मेसेज आणि लिंक जाते. ही एक व्हायरस लिंक आहे. ही लिंक तुम्हाला  युट्युब सारख्या दिसणाऱ्या फेक साईटवर घेऊन जाते. जिथे मेसेंजर सारखंच पेज दिसतं, तिथे लॉग इन केल्याशिवाय व्हिडिओ दिसणार नाही असं सांगितलं जातं...लॉगइन साठी आपण आपला तपशील टाकला की, हॅकर्सच्या हातात आपण आयत्या अनेक गोष्टी देऊन टाकतो. हा ट्रॅप आहे यात अडकू नका.

असे अनेक ट्रॅप्स सोशल मीडियावर पेरलेले असतात. आणि या जाळ्यात आपण अलगद अडकतो. असाच एक प्रकार फेसबुक मेसेंजर किंवा व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉलच्या संदर्भात होताना दिसतो. ज्यात अनोळखी नंबरवरून व्हिडिओ कॉल येतो, कॉल उचलला गेला तर, समोरची व्यक्ती नग्न अवस्थेत असते. याचा व्हिडिओ ती समोरची व्यक्ती काढते आणि तो व्हायरल करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेलिंगला सुरुवात होते. 

याशिवाय फेसबुकवरच दुसऱ्या एखाद्या व्यक्तीच्या नावाने प्रोफाइल बनवून, लोकांकडून आर्थिक मदत मागितली जाते. त्यासाठी भावनिक हाक दिली जाते. सदर प्रोफाईलवर जाऊन बघितलं तर, ते खरंखुरं वाटेल इतपत परफेक्ट बनवलेलं असतं. समजा अ हे मूळ खरं प्रोफाइल आहे. आणि ब हे खोटं किंवा फेक प्रोफाइल आहे. तर ब बनवणारा सगळे डिटेल्स अ च्या प्रोफाईलवरून उचलतो. कॉपी पेस्ट करतो. आणि स्वतःचं खोटं खातं तयार करतो. त्यावरून मैत्री करतो, गप्पा मारतो आणि आर्थिक मदतीची हाकही देतो. दोनचार मासे गळाला लागले, पैसे आले की, खातं बंद होतं आणि बहुरुपिया गायब होतो. हा कॅट फिशिंगचा एक प्रकार आहे. असे कितीतरी गुन्हे ऑनलाईन जगतात केले जातात, त्याबद्दल अधिक पुढच्या भागात. 

Web Title: It’s you in the video! Have you received such a message? : What will you do?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.