...अन् गुगल सर्चमधून सीएए, एनआरसीच गायब झाले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2019 11:09 AM2019-12-24T11:09:27+5:302019-12-24T11:10:16+5:30
गेल्या काही दिवसांपासून नागरिकता सुधारणा कायदा आणि एनआरसीवरून देशभरात हिंसाचार उफाळलेला होता. केंद्र सरकारने केलेल्या या कायद्यांवरून गुगलवर मोठ्या प्रमाणावर सर्चिंग केले जात होते.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून नागरिकता सुधारणा कायदा आणि एनआरसीवरून देशभरात हिंसाचार उफाळलेला होता. केंद्र सरकारने केलेल्या या कायद्यांवरून गुगलवर मोठ्या प्रमाणावर सर्चिंग केले जात होते. यामुळे सीएए आणि एनआरसी हे विषय लोकांच्या कुतुहलाचे बनले होते. मात्र, काल हे दोन्ही वादग्रस्त ठरलेले विषय अचानक गुगल सर्चमधून गायब झाले.
झाले असे, की काल झारखंडच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल होता. दोन दिवसांपूर्वीच आलेल्या एक्झिट पोलमध्ये तेथे भाजपाची हार होणार असल्याचे सांगितले गेले होते. यामुळे साऱ्या देशाचे लक्ष झारखंडमध्ये लागले होते. विशेष म्हणजे 2014 मध्ये भाजपाने झारखंडची निवडणूक जिंकून विजयाचे शिखर चढायला सुरूवात केली होती. काल या राज्यात भाजपाला पराभवाचा सामना करावा लागला. निवडणुकीचा काळ एवढा गाजला नव्हता, मात्र या राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी सभा घेतल्या होत्या.
काँग्रेसकडून काहीसा उत्साह मावळलेलाच दिसत होता. शेवटच्या दोन टप्प्यांत राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी प्रचार केला होता. तर सोनिया गांधी फिरकल्याही नव्हत्या. मात्र, भाजपबाबत लोकांमध्ये असलेली नाराजी आणि कदाचित एनआरसी, सीएएचा वाद यामुळे भाजपाला पराभव पहावा लागला. यामुळे कालचा दिवस गुगलवर झारखंड निकालाने गाजवला.
गुगल ट्रेंडच्या डेली सर्च सेक्शनमध्ये झारखंड इलेक्शन रिझल्ट आजही नंबर एकवर आहे. तर गुगलवर कालच्या दिवसभरात झारखंड निवडणुकीशी संबंधित 20 लाखांहून अधिकवेळा सर्च करण्यात आले आहे. यानंतर युजर शेतकरी दिन आणि भाजपा सर्च करत होते.
तर झारखंडचे मुख्यमंत्री रघुवर दास आणि होणारे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना सारखेच सर्च करण्यात येत होते. गुगल ट्रेंडवर दोघांनाही 19 रँक मिळाले होते. तर सीएए, एनआरसी बाबत युजरनी सोमवारपासून सर्च न केल्याने जवळपास ट्रेंडमधून गायबच झाले होते.
सर्वाधिक सर्च केले जाणारे कीवर्ड
Jharkhand Election
election results jharkhand
Jharkhand
JMM
jharkhand news
Election Results
jharkhand result