जिओ युजर्स सावधान ! 'या' अटीचं उल्लंघन केल्यास फ्री कॉल सर्व्हिस होणार बंद
By शिवराज यादव | Published: October 9, 2017 04:02 PM2017-10-09T16:02:56+5:302017-10-09T16:07:53+5:30
रिलायन्स जिओ रोज नवनवे प्लान्स आणून मोबाइल युजर्सना आफल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. यादरम्यान रिलायन्स जिओ आपल्या युजर्सना झटका देण्याच्या तयारीत आहे
मुंबई - रिलायन्स जिओ रोज नवनवे प्लान्स आणून मोबाइल युजर्सना आफल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. यादरम्यान रिलायन्स जिओ आपल्या युजर्सना झटका देण्याच्या तयारीत आहे. जिओने अशा युजर्सवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे, जे दिवसाला 300 हून अधिक जास्त कॉल्स करत आहेत. आपल्या जिओ क्रमांकाचा व्यवसायिक वापर करणा-यांवर जिओची नजर आहे. रिलायन्स जिओदेखील इतर कंपन्यांप्रमाणे डेली लिमिट लागू करण्याची शक्यता आहे. काही मोबाइल कंपन्या दिवसाला 300 फोन कॉल्स आणि संपुर्ण आठवड्यात 1200 हून जास्त फ्री कॉल्स करण्याची सुविधा देत नाहीत, त्याहून जास्त कॉल केल्यास चार्ज लागतो. रिलायन्स जिओदेखील अशाप्रकारे मर्यादा लागू करण्याची शक्यता आहे.
व्यवसायिक वापरसाठी जिओ क्रमांकाचा वापर करणा-यांवर जिओने नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे. जर तुम्हीदेखील जिओ क्रमांकाचा व्यवसायिक वापर करत असाल तर कॉल लिमिट लागू होण्याची शक्यता आहे. जर तुम्हाला तुमची सेवा अखंडित ठेवायची असल्यास व्यवसायिक वापर करणं बंद करावं लागणार आहे. व्यवसायिक वापर केल्यास कंपनीकडे फ्री कॉलिंग बंद करण्याचा अधिकार आहे.
रिलायन्स जिओने आपल्या 4जी फोनची डिलिव्हरी करण्यास सुरुवात केली आहे. जिओ हा फोन शून्य रुपयात देत आहे. त्यासाठी फक्त एकच अट आहे, ती म्हणजे 1500 रुपयांचं सेक्युरिटी डिपॉजिट भरावं लागेल. हे डिपॉजिट तीन वर्षांनी पुन्हा परत केलं जाईल. संपुर्ण डिपॉजिट परत हवं असल्यास, वर्षाला किमान 1500 रुपयांचा रिचार्ज करणं बंधनकारक असणार आहे. तेव्हाच तुम्हाला तुमचे 1500 रुपये परत मिळतील.
जर तुम्ही जिओ मोबाइल फोनचं प्री बुकिंग केलं होतं आणि अद्याप तुम्हाला तो मिळाला नसेल तर तुम्ही ते माहिती करु शकता. तुमच्या मोबाइल फोनचा स्टेटस काय आहे हे जाणून घेण्यासाठी 18008908900 या क्रमांकावर फोन करा. येथे तुमचा रजिस्टर्ड मोबाइल क्रमांक मागितला जाईल. ज्या मोबाइल क्रमांकावरुन तुम्ही जिओ मोबाइल फोनचं प्री बुकिंग केलं असेल तोच क्रमांक तुम्हाला द्यायचा आहे. यानंतर जेव्हा तुम्ही तुमचा मोबाइल क्रमांक द्याल तेव्हा तुमच्या फोनचं स्टेटस कळेल.