फक्त 399 रुपयांत अनेक बेनिफेट्स, Jio चा सर्वात स्वस्त पोस्टपेड प्लॅन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2022 07:47 PM2022-08-03T19:47:10+5:302022-08-03T19:50:31+5:30
Jio Postpaid Plan with Free OTT Subscription : या प्लॅनमध्ये तुम्हाला कॉमन पोस्टपेडचे बेनिफिट्स दिले जात आहेत. तसेच त्यामधील यूजर्सना OTT बेनिफिट्सही दिले जात आहेत.
नवी दिल्ली : जर तुम्ही पॉवरफुल पोस्टपेड प्लान घेण्याचा विचार करत असाल, तर आज आम्ही तुमच्यासाठी Jio चा असा दमदार प्लॅन सांगत आहोत, जो किफायतशीर तर आहेच, पण यामध्ये एकापेक्षा एक बेनिफिट्सही दिले जात आहेत, जे ग्राहकांना खूप आवडतील. मनोरंजनाची आवड असलेल्या लोकांना लक्षात घेऊन काही खास बेनिफिट्सही दिले जात आहेत. आज आम्ही तुम्हाला या प्लॅनबाबत सविस्तर सांगणार आहोत.
आम्ही ज्या जिओ प्लॅनबद्दल बोलत आहोत, त्याची किंमत 399 रुपये आहे आणि हा एक पोस्टपेड प्लॅन आहे, त्यामुळे ग्राहकांना यापुढे असा विचार करावा लागणार नाही की प्लॅनचे बेनिफिट्स अचानक संपू नयेत. पोस्टपेड प्लॅनमध्ये हा सर्वोत्तम बेनिफट आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला कॉमन पोस्टपेडचे बेनिफिट्स दिले जात आहेत. तसेच त्यामधील यूजर्सना OTT बेनिफिट्सही दिले जात आहेत.
जिओच्या सर्वात स्वस्त पोस्टपेड प्लॅनमध्ये अनेक बेनिफिट्सचा समावेश आहे, परंतु सर्वात आकर्षक ऑफर म्हणजे Netflix, Amazon Prime आणि Disney Plus Hotstar सारख्या अनेक दमदार OTT प्लॅटफॉर्मचे मोफत सबस्क्रिप्शन, जे लोक सहसा खरेदी करतात आणि त्यांची किंमत अनेकदा या पोस्टपेड प्लॅनपेक्षा अधिक होते.
काय आहे बेनिफिट्स?
या प्लॅनची किंमत फक्त 399 रुपये आहे, जरी मोफत OTT सबस्क्रिप्शनसह, ग्राहकांना या प्लॅनमध्ये दरमहा 75GB डेटा मिळतो. हा डेटा इतका आहे की सामान्य इंटरनेट युजर्ससाठी तो पुरेसा आहे. यासोबतच अनलिमिटेड कॉलिंगसोबतच ग्राहकांना दररोज 100 एसएमएसचाही लाभ मिळतो. जर अतिरिक्त बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाले तर, या प्लॅनमध्ये ग्राहकांना 1 अतिरिक्त सिम कार्ड दिले जाते. तसेच, या प्लॅनचे सबस्क्रिप्शन जिओ अॅप्स मोफत उपलब्ध आहे.