Jio चा धमाका! कमी किंमतीत मिळेल ८४ दिवसांची व्हॅलिडिटी अन् अनलिमिटेड कॉलिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 12:18 PM2024-08-27T12:18:14+5:302024-08-27T12:19:29+5:30
Jio Recharge Plan : या प्लॅनच्या खरेदीसाठी युजर्सना जिओच्या अधिकृत वेबसाइटवर किंवा माय जिओ ॲपवर (My Jio App) जावं लागेल.
Jio Recharge Plan : नवी दिल्ली : अलीकडेच जिओनं (Jio) आपल्या रिचार्ज प्लॅनच्या किंमतीत वाढ केली होती. यामुळे युजर्सना बेनिफिट्स मिळवण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागले. दरम्यान, आम्ही आज अशाच एका प्लॅनबद्दल सांगणार आहोत, ज्याचे अनेक बेनिफिट्स आहेत. या प्लॅनची व्हॅलिडिटी ८४ दिवसांची आहे. या प्लॅनच्या खरेदीसाठी युजर्सना जिओच्या अधिकृत वेबसाइटवर किंवा माय जिओ ॲपवर (My Jio App) जावं लागेल. याठिकाणीच हा प्लॅन उपलब्ध आहे.
जिओचा ४७९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन
जिओचा हा प्लॅन खरेदी करण्यासाठी तुम्हाला माय जिओ ॲप किंवा जिओ साइटवर जावं लागेल. येथे तुम्ही ८४ दिवसांच्या रिचार्ज प्लॅनवर गेलात तर हा प्लॅन दिसेल. तसंच तुम्ही हा प्लॅन इतर कोणत्याही ॲपवरून घेऊ शकत नाही. हा प्लॅन पेटीएम, फोनपे किंवा इतर कोणत्याही ॲपवरून खरेदी करता येणार नाही. या रिचार्जसाठी तुम्हाला फक्त जिओ साइटची मदत घ्यावी लागेल. अशा परिस्थितीत हा तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरणार आहे.
बेनिफिट्स
तुम्ही जिओचा हा प्लॅन विकत घेतल्यास तुम्हाला त्याची व्हॅलिडिटी ८४ दिवसांची मिळेल. यामध्ये एकूण ६ जीबी डेटा देण्यात आला आहे. तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग देखील मिळेल. तसंच, एकूण १००० एसएमएस दिले जातात आणि त्यासोबत जिओ ॲप्सचे सबस्क्रिप्शनही दिले जाते. यामध्ये Jio TV, Jio Cinema चे सबस्क्रिप्शन देखील मिळत आहे. यामुळेच कमी किमतीत रिचार्ज प्लॅन शोधणाऱ्या अशा यूजर्ससाठी हा एक चांगला पर्याय ठरणार आहे. या दृष्टीकोनातून पाहिले तर तुमचा मासिक खर्च १५९ रुपये होईल.
जिओचा नवीन प्रकल्प
दरम्यान, फास्ट इंटरनेट सप्लाय करण्यासाठी मुकेश अंबानी यांनी जिओचा एक नवीन प्रकल्प सुरू केला आहे. यामध्ये अंडर सी केबलवर काम सुरू करण्यात आले असून सुपरफास्ट इंटरनेटसाठी मुंबई आणि चेन्नई येथे डाटा सेंटर्सची स्थापना करण्यात आली आहे. एकदा लाँच झाल्यानंतर युजर्सना सुपरफास्ट इंटरनेट मिळणार आहे, जे बऱ्याच बाबतीत चांगलं सिद्ध होईल. तसंच, फास्ट इंटरनेटमुळं तुम्हाला कोणत्याही समस्येचा सामना करावा लागणार नाही.