जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2024 04:10 PM2024-11-25T16:10:33+5:302024-11-25T16:11:49+5:30

Jio AirFiber : जिओ कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी एक खास ऑफर आणली आहे.

Jio AirFiber Available for 50 Days at Just Rs 1111: Offer Details Here | जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!

जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!

नवी दिल्ली : जिओ (Jio) ही भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. जिओचे 45 कोटींहून अधिक ग्राहक आहेत. मोबाईल फोनसाठी 4G आणि 5G प्लॅनव्यतिरिक्त, जिओ घरासाठी फायबर आणि वायरलेस इंटरनेट (AirFiber) सारख्या सेवा देखील प्रदान करते. जिओ स्वस्त रिचार्ज  प्लॅनसाठी सिद्ध आहे. तसेच, कंपनी नवीन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेकदा स्वस्त आणि मस्त ऑफर आणत असते.

अलीकडे, जिओ कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी एक खास ऑफर आणली आहे. जे ग्राहक आधीपासून जिओचे 5G नेटवर्क वापरत आहेत. ते फक्त 1111 रुपयांत AirFibre कनेक्शन घेऊ शकतात, जे 50 दिवसांसाठी व्हॅलिड असणार आहे. विशेष म्हणजे, हे एका महिन्यापेक्षा जास्त आहे आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे जिओ या ऑफरमध्ये 1000 रुपयांचे इंस्टॉलेशन चार्ज देखील आकारत नाही. त्यामुळे मोठी बचत होऊ शकते.

याआधी, जर तुम्ही जिओ AirFibre चा 3, 6 किंवा 12 महिन्यांचा प्लॅन घेतला असेल, तर तुम्हाला इंस्टॉलेशनसाठी कोणतेही पैसे द्यावे लागत नव्हते. पण आता जिओने आपल्या ऑफरमध्ये आणखी बदल केला आहे. आता तुम्ही फक्त 50 दिवसांचा प्लॅन घेतला तरी तुम्हाला इंस्टॉलेशनसाठी कोणतेही पैसे द्यावे लागणार नाहीत. 

जिओचे AirFibre देशातील अनेक भागांमध्ये उपलब्ध आहे आणि भारतातील बहुतेक लोक या प्रकारचे वायरलेस इंटरनेट वापरतात. जिओचे उद्दिष्ट लवकरच देशभरातील एक लाख घरांना एअरफायबरने जोडण्याचे आहे. जिओ AirFiber च्या काही प्लॅनमध्ये तुम्हाला अनेक OTT ॲप्सचे मोफत सबस्क्रिप्शन देखील मिळते. यासोबतच या प्लॅन्समध्ये इंटरनेटचा स्पीडही खूप वेगवान आहे. या प्लॅनमध्ये तुम्ही 1 Gbps पर्यंतच्या वेगाने इंटरनेट वापरू शकता.
 

Web Title: Jio AirFiber Available for 50 Days at Just Rs 1111: Offer Details Here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.