हाय स्पीड 5G इंटरनेट; 19 सप्टेंबरपासून मिळणार Jio AirFiber, जाणून घ्या संपूर्ण माहिती...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2023 05:31 PM2023-08-31T17:31:29+5:302023-08-31T17:31:49+5:30
Jio AirFiber ची कमर्शिअल लॉन्चिंग गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर 19 सप्टेंबर रोजी होणार आहे.
नवी दिल्ली: रिलायन्स समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी सोमवारी (28 ऑगस्ट) कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत Jio AirFiber लॉन्चिंगची घोषणा केली. येत्या 19 सप्टेंबर 2023 पासून याची विक्री सुरू होईल. जिओ एअरफायबरद्वारे देशातील दुर्गम भागात हाय स्पीड इंटरनेट कनेक्टिव्हिटी प्रदान करणे, हा यामागचा हेतू आहे.
तुम्ही Jio Fiber बद्दल ऐकले असेलच, त्याचा वापरही अनेकजण करत आहेत. पण, आता जे नवीन डिव्हाइस लॉन्च होत आहे, त्याचे नाव Jio AirFiber आहे. नावाप्रमाणेच, हे वायरलेस असेल. Jio AirFiber कसे काम करेल आणि हे Jio Fiber पेक्षा किती वेगळे आहे, हे जाणून घेऊ.
Jio Fiber हे एक हाय-स्पीड ब्रॉडबँड कनेक्शन आहे, ज्यात इंटरनेट पुरवण्यासाठी ऑप्टिकल फायबर वापरले गेले आहे. पण, JioFiber लाही इंटरनेट पुरवण्यासाठी प्रत्यक्ष वायरिंगची आवश्यकता नाही. याद्वारेही देशातील अनेक दुर्गम भागात हाय-स्पीड इंटरनेटची सुविधा पुरवली जाऊ शकते. आता लॉन्च होणारे Jio AirFiber याचेच अपडेटेट व्हर्जन असेल. याद्वारे हाय स्पीड 5G सेवा पुरवली जाईल.
Jio AirFiber कसे वापरावे?
Jio AirFiber वापरण्यासाठी अँटेना आणि राउटरची आवश्यकता असेल. प्लग इन केल्यानंतर याचे काम सुरू होईल. याद्वारे ऑफिस किंवा घर हाय-स्पीड इंटरनेटशी सहजपणे जोडले जाऊ शकते. Jio AirFiber लांब अंतराच्या कनेक्टिव्हिटीसाठी कंपनीच्या 5G नेटवर्कचा वापर करेल. हे 5G हॉटस्पॉट उपकरण असेल. म्हणजेच हे मोबाईलप्रमाणे थेट टॉवरशी जोडले जाईल आणि हायस्पीड नेटवर्क देईल.
Jio Air Fiber ची किंमत काय असेल?
सध्या Jio AirFiber ची किंमत कंपनीने जाहीर केलेली नाही. नुकतेच असे सांगण्यात आले आहे की Jio AirFiber चे व्यावसायिक लॉन्च यावर्षी गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर 19 सप्टेंबर रोजी केले जाईल. तुमच्या जवळच्या जिओ रिटेल स्टोअर, जिओ अॅप आणि कंपनीच्या अधिकृत साइटवरून खरेदी करू शकाल.