Jio, Airtel 5G Speed Tested on Ookla: ओक्लाने पोलखोलच केली! एअरटेल की जिओ? कोणाचा 5G स्पीड जास्त...ही घ्या आकडेवारी...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2022 12:14 PM2022-10-12T12:14:32+5:302022-10-12T12:15:27+5:30

ओक्ला या इंटरनेट स्पीड तपासता येणाऱ्या अॅपच्या कंपनीने ५जीचा इंटरनेट स्पीड किती ते समोर आणले आहे.

Jio, Airtel 5G Speed Tested on Ookla: Whose 5G speed is higher... here are the statistics... | Jio, Airtel 5G Speed Tested on Ookla: ओक्लाने पोलखोलच केली! एअरटेल की जिओ? कोणाचा 5G स्पीड जास्त...ही घ्या आकडेवारी...

Jio, Airtel 5G Speed Tested on Ookla: ओक्लाने पोलखोलच केली! एअरटेल की जिओ? कोणाचा 5G स्पीड जास्त...ही घ्या आकडेवारी...

Next

देशात ५ जी सेवा लाँच झाली आहे. एअरटेल आणि जिओने काही शहरांमध्ये ती सुरु केली आहे. आता या दोन कंपन्यांमध्ये वेगाची स्पर्धा लागली आहे. कोणाचा वेग जास्त आहे, याचबरोबर काही दिवसांत रिचार्जवरून देखील स्पर्धा रंगणार आहे. यात कोणाचा फायदा ते येणारा काळच सांगेल, परंतू सध्या वेगाच्या स्पर्धेत कोण पुढे आहे हे Ookla ने सांगून टाकले आहे. 

Airtel Vs Jio 5G: एअरटेल की जिओ? कोणाचा 5G स्पीड, कव्हरेज सुपरफास्ट असणार; कोणाचे स्वस्त रिचार्ज

ओक्ला या इंटरनेट स्पीड तपासता येणाऱ्या अॅपच्या कंपनीने ५जीचा इंटरनेट स्पीड किती ते समोर आणले आहे. ओक्लानुसार जियोचा टॉप स्पीड 600Mbps पर्यंत असल्याचे समोर आले आहे. या रिपोर्टमध्ये दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि वाराणसीच्या शहरांचा इंटरनेट स्पीडचा सर्व्हे करण्यात आला आहे. Jio True 5G आणि Airtel 5G Plus मध्ये जिओने बाजी मारली आहे. 
यानुसार दिल्लीत एअरटेलचा 5G स्पीड 197.98Mbps मिळत आहे. म्हणजे जवळपास 200Mbps. तर जिओ ५जीचा स्पीड त्याच्या तिप्पट म्हणजेच 598.58 Mbps एवढा प्रचंड मिळत आहे. कोलकातामध्ये एअरटेलचा स्पीड 33.83 Mbps एवढा कमी होता, तर जिओ ५जी चा स्पीड 482.02 Mbps एवढा होता. या दोन शहरांत जिओने बाजी मारली आहे. परंतू हे देखील लक्षात घ्यायला हवे की, एअरटेलने सर्वांसाठी ५जी सेवा उपलब्ध केली आहे, तर जिओने लिमिटेड युजरसाठीच ५जी नेटवर्कची टेस्टिंग सुरु केली आहे. 

मुंबईत एअरटेल ५जी युजर्सना 271.07 Mbps पर्यंतचा वेग मिळाला आहे. तर जिओ युजर्सना 515.38 Mbps चा वेग मिळाला आहे. वाराणसीत मात्र दोन्ही ऑपरेटर्समधील वेगाचे अंतर कमीच नाही तर जिओला एअरटेलने मागे टाकले आहे. एअरटेलने 516.57 Mbps पर्यंतचा स्पीड नोंदविला आहे. तर जिओने 485.22 Mbps चा स्पीड दिला आहे. 

ओक्लाच्या ग्राहक सर्व्हेनुसार ८९ टक्के भारतीय स्मार्टफोन ग्राहक ५जी नेटवर्कवर अपग्रेड होण्यास इच्छुक आहेत. गेल्या दोन वर्षांत अनेक ग्राहकांनी 5G रेडी स्मार्टफोन खरेदी केले आहेत. या डिव्हाईसवर सध्या जिओचे ग्राहक सर्वाधिक आहेत. सर्वाधिक ५जी फोन हे हैदराबादमध्ये वापरले जात आहेत. यातही आयफोन युजर्स जास्त आहेत. तिथे ५१ टक्के ग्राहकांकडे ५जी फोन आहेत. 
 

Web Title: Jio, Airtel 5G Speed Tested on Ookla: Whose 5G speed is higher... here are the statistics...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.