BSNL च्या स्वस्त प्लॅनसमोर Jio-Airtel फेल; वर्षभर रिचार्जचे टेन्शन नाही, भरपूर डेटाही मिळेल...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 06:53 PM2024-10-23T18:53:41+5:302024-10-23T18:53:54+5:30
BSNL ने एक वर्षांची व्हॅलिडिटी असलेला स्वस्त प्लॅन लॉन्च केला आहे.
BSNL : खासगी टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या रिचार्जच्या किमती वाढवल्यापासून BSNL ला सुगीचे दिवस आले आहेत. लाखो ग्राहक बीएसएनएलकडे वळत आहेत, त्यामुळेच आता सरकारकडून टेलिकॉम कंपनीचे पुनरुज्जीवन करण्याचे काम जोरात सुरू आहे. बीएसएनएलचा नवीन लोगो आणि स्लोगन मंगळवारी( 22 ऑक्टोबर) जारी करण्यात आला आहे. याशिवाय 7 नवीन सेवाही सुरू करण्यात आल्या आहेत.
BSNL च्या 4G आणि 5G सेवेसाठी 1 लाख नवीन मोबाईल टॉवर बसवले जात आहेत. एवढेच नाही, तर कंपनीने आपल्या लाखो यूजर्सना खुश करण्यासाठी भविष्यात रिचार्ज प्लॅन महाग केले जाणार नसल्याचे जाहीर केले आहे.
BSNL आपल्या स्वस्त रिचार्ज प्लॅन्समुळे लोकांच्या पसंतीस उतरले आहे. या सरकारी टेलिकॉम कंपनीचा असाच एक स्वस्त प्लॅन आहे, ज्यासाठी यूजरला संपूर्ण महिन्यात 140 रुपयांपेक्षा कमी खर्च करावा लागतो. या प्लॅनची वैधता 365 दिवसांची आहे. म्हणजेच संपूर्ण 1 वर्षासाठी रिचार्जचे कोणतेही टेंशन असणार नाही. याव्यतिरिक्त, या प्रीपेड रिचार्ज प्लॅनमध्ये युजर्सना अमर्यादित कॉलिंग, मोफत नॅशनल रोमिंग, मोफत एसएमएस आणि इंटरनेट डेटा यासारखे फायदे देखील मिळतात.
365 दिवसांचा स्वस्त प्लॅन
भारत संचार निगम लिमिटेडचा हा रिचार्ज प्लॅन 1,499 रुपयांचा आहे. या प्लॅनची वैधता 365 दिवसांची आहे आणि यामध्ये युजर्सना भारतातील कोणत्याही नेटवर्कवर मोफत कॉलिंगचा लाभ मिळतो. याशिवाय, या प्लॅनमध्ये, दररोज 100 मोफत एसएमएस आणि एकूण 24GB हाय स्पीड डेटाचा लाभ मिळतो.
बीएसएनएलचा हा प्लॅन खासकरून अशा यूजर्ससाठी आहे, जे जास्त डेटा वापरत नाहीत आणि फक्त कॉलिंगसाठी त्यांचा नंबर सुरू ठेवू इच्छितात. विशेष म्हणजे, खाजगी कंपन्या Airtel, Jio आणि Vi चा सर्वात स्वस्त 1 वर्षाचा प्लॅन 1,899 रुपयांपेक्षा कमीत मिळत नाही.