शानदार Broadband सर्व्हिस, दोन महिन्यांपर्यंत मिळेल मोफत, इंटरनेट स्पीड सुद्धा जबरदस्त!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2023 10:57 AM2023-01-20T10:57:49+5:302023-01-20T10:58:27+5:30

Netplus Broadband : नेटप्लस ब्रॉडबँड दोन महिन्यांसाठी मोफत सर्व्हिस देत आहे.

jio and airtel came to get rid of this broadband internet will run for free for 2 months | शानदार Broadband सर्व्हिस, दोन महिन्यांपर्यंत मिळेल मोफत, इंटरनेट स्पीड सुद्धा जबरदस्त!

शानदार Broadband सर्व्हिस, दोन महिन्यांपर्यंत मिळेल मोफत, इंटरनेट स्पीड सुद्धा जबरदस्त!

googlenewsNext

नवी दिल्ली : JioFiber आणि Airtel Xstream Fiber खूप लोकप्रिय इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हाइडर आहे. हे कमी किंमतीत जास्त डेटा आणि हाय स्पीड इंटरनेट प्रोव्हाइड करते. मात्र, आणखी एक इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हाइडर कंपनी आहे, जी शानदार प्लॅन घेऊन आली आहे. दरम्यान, आम्ही सांगत आहोत, नेटप्लस ब्रॉडबँडबाबत (Netplus Broadband).

नेटप्लस ब्रॉडबँडची सर्व्हिस हरयाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, राजस्थान, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशमध्ये उपलब्ध आहे. नेटप्लस ब्रॉडबँड दोन महिन्यांसाठी मोफत सर्व्हिस देत आहे. या प्लॅनमध्ये 1GBPS पर्यंत स्पीड मिळू शकतो. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड डेटा ऑफर केला जात आहे. जर तुम्ही ब्रॉडबँडचा कोणताही प्लॅन घेत असाल तर तुम्हाला दोन महिन्यांसाठी मोफत मिळणार आहेत. 

जर युजर दोन महिन्यांसाठी मोफत सर्व्हिस घेणार असतील तर त्यांना लाँग टर्म व्हॅलिडिटीवाला प्लॅन घ्यावा लागेल. जर युजर्स पाच महिन्यांसाठी प्लॅन घेत असतील तर त्यांना एक महिन्यांसाठी मोफत सर्व्हिस मिळेल. तसेच, दहा महिन्यांसाठी पैसे देऊन ग्राहक एक वर्षभरासाठी प्लॅन घेऊ शकतात. 

Jio और Airtel पसीने छुड़ाने आया ये Broadband! 2 महीने तक Free में चलेगा इंटरनेट; कीमत भी कम

499 रुपयांचा प्लॅन
ब्रॉडबँड प्लॅन ओटीटी बेनिफिट्स आणि ओटीटी वेनिफिट्सशिवाय येतो. नेटप्लस ब्रॉडबँड बेसिक प्लॅनची किंमत 499 रुपये आहे. प्लॅनमध्ये अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंगची सुविधा मिळते. प्लॅनमध्ये 100Mbps ची स्पीड मिळते. तसेच, प्लॅनमध्ये टॅक्सचा समावेश करण्यात आला नाही. जर तुम्ही हा प्लॅन घेतला, तर तुम्हाला 499 रुपये आणि टॅक्स भरावा लागणार आहे.  

दरम्यान, इतर इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हाइडर इतक्या स्वस्त किंमतीत 100mbps असलेला प्लॅन देत नाहीत. एअरटेल आणि जिओच्या 100Mbps प्लॅनची किंमत अनुक्रमे 699 आणि 799 रुपये आहे. यापेक्षा नेटप्लस ब्रॉडबँडचे प्लॅन शानदार आहेत.

Web Title: jio and airtel came to get rid of this broadband internet will run for free for 2 months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.