Jio अन् Airtel ला बसणार धक्का; BSNL ने आणला 200 दिवसांच्या व्हॅलेरडिटीचा जबरदस्त प्लॅन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2024 03:57 PM2024-11-27T15:57:59+5:302024-11-27T15:58:12+5:30
सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL चा देशात झपाट्याने विस्तार होत आहे.
BSNL New Plan: सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL चा देशात झपाट्याने विस्तार होत आहे. काही महिन्यांपूर्वी खाजगी टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या रिचार्जच्या किमती वाढवल्यानंतर BSNL चे 'अच्छे दिन' सुरू झाले. BSNL देखील या संधीच सोनं करण्यासाठी देशात आपले नेटवर्क खूप वेगाने विस्तारत आहे. तसेच, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी BSNL ने एक नवीन रिचार्ज प्लॅन लॉन्च केला आहे. यामध्ये ग्राहकांना 200 दिवसांची व्हॅलिडिटी मिळते.
BSNL चा 999 रुपयांचा प्लॅन
आम्ही तुम्हाला ज्या प्लॅनबद्दल सांगणार आहोत, त्यात 200 दिवसांची दीर्घ वैधता मिळते. तसेच, यात अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा आहे, ज्यामुळे कॉलिंगसाठी हा एक उत्कृष्ट पर्याय आहे. मात्र, या प्लॅनमध्ये इंटरनेट डेटा मिळत नाही. हा प्लॅन अशा ग्राहकांसाठी फायदेशीर आहे, जे प्रामुख्याने कॉलिंगसाठी मोबाईल वापरतात.
BSNL चा 997 रुपयांचा प्लॅन
बीएसएनएलकडे 997 रुपयांचा प्लॅनदेखील आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग, दररोज 100 मोफत एसएमएस आणि दररोज 2GB हाय-स्पीड डेटाची सुविधा दिली जाते. हा प्लॅन 160 दिवसांच्या वैधतेसह येतो. ज्या युजरला कॉलिंग आणि डेटाचा वापर करायचा आहे, त्यांच्यासाठी हा प्लॅन सर्वोत्तम आहे.
BSNL ची Jio आणि Airtel शी स्पर्धा
Jio, Airtel आणि Vodafone Idea सारख्या कंपन्या BSNL प्रमाणे 200 दिवसांच्या वैधतेचे प्लॅन ऑफर करत नाहीत. BSNL ने परवडणारे दर आणि दीर्घ वैधतेसह बाजारपेठेत एक स्थान निर्माण केले आहे.