Jio युझर्ससाठी बॅड न्यूज! 'हे' चार किफायतशीर प्रीपेड प्लान बंद
By देवेश फडके | Published: January 17, 2021 03:20 PM2021-01-17T15:20:47+5:302021-01-17T15:23:17+5:30
Reliance Jio ने जिओ फोनचे चार प्लान बंद केले आहेत. हे प्लान विशेष करून नॉन-जिओ व्हॉइस कॉलसाठी उपयुक्त असे मानले जात होते.
नवी दिल्ली : Reliance Jio ने जिओ फोनचे चार प्लान बंद केले आहेत. हे प्लान विशेष करून नॉन-जिओ व्हॉइस कॉलसाठी उपयुक्त असे मानले जात होते. Jio कडून बंद करण्यात आलेले चारही प्लान अगदी किफायशीर होते. हे प्लान बंद झाल्यामुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार असे बोलले जात आहे.
जिओ फोनचे ९९ रुपये, १५३ रुपये, २९७ रुपये आणि ५९४ रुपये असे प्लान आता बंद करण्यात आले आहेत. जिओ फोन ऑल इन वन प्लान्सप्रमाणे यामध्ये नॉन-जिओ मिनिट्स देण्यात आले नव्हते, असे सांगितले जात आहे. या सेगमेंटमध्ये आता जिओकडे ७५ रुपये, १२५ रुपये, १५५ रुपये आणि १८५ रुपयांचे प्लान आहेत. ९९ रुपये, १५३ रुपये, २९७ रुपये आणि ५९४ रुपये या प्लानची वैधता अनुक्रमे २८ दिवस, ८४ दिवस आणि १६८ दिवस होती. तसेच यातील तीन प्लानमध्ये जिओ टू जिओ आणि नॉन-जिओ कॉलिंग मिनिट्सची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र, आता हे प्रीपेड प्लान बंद करण्यात आले आहेत.
Jio कडून आता ७५ रुपये, १२५ रुपये, १५५ रुपये आणि १८५ रुपयांचे प्लान उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ७५ रुपयांच्या प्लानमध्ये युझर्सना देशातील कोणत्याही नेटवर्कसाठी अनलिमिटेड कॉलिंग, दररोज १०० एमबी डेटा आणि ५० एसएमएस ऑफर केले जात आहेत. १२५ रुपयांच्या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, दररोज ५०० एमबी डेटा आणि ३०० एसएमएस ऑफर केले जात आहे.
Jio च्या १५५ रुपयांच्या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, दररोज १ जीबी डेटा आणि १०० एसएमएस ऑफर केले जात आहेत. तर, १८५ रुपयांच्या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, दररोज २ जीबी डेटा आणि १०० एसएमएस ऑफर केले जात आहेत. या सर्व प्लानची वैधता २८ दिवसांची आहे.