Jio Fiber चे धमाकेदार प्लॅन्स झाले लाँच; 4K Set-top Box मिळेल मोफत
By सिद्धेश जाधव | Published: June 16, 2021 03:05 PM2021-06-16T15:05:43+5:302021-06-16T15:10:06+5:30
Jio Fiber new plans: 399 रुपये प्रतिमाहपासून सुरु होणाऱ्या नवीन प्लॅन्सची घोषणा जियो फायबरने केली आहे, हे सर्व प्लॅन्स 17 जूनपासून लागू होतील.
24 जूनला Reliance AGM होणार आहे, या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत अनेक घोषणा केल्या जातील. तत्पूर्वी कंपनीने जियो फायबर युजर्ससाठी अनेक नवीन पोस्टपेड प्लॅन आणले आहेत. या प्लॅन्सची किंमत 399 रुपये प्रतिमाहपासून सुरु होत आहे. हे सर्व प्लॅन्स 17 जूनपासून लागू होतील. (Jio anounced new plans for Jio Fiber users)
नवीन युजर्सना या प्लॅनसह राउटर मोफत मिळेल, अशी कंपनीने घोषणा केली आहे. तसेच, कोणतीही इंस्टॉलेशन फी द्यावी लागणार नाही, त्यामुळे ग्राहकांचे 1500 रुपये वाचतील. परंतु, फ्री राउटर आणि इंस्टॉलेशन मिळवण्यासाठी ग्राहकांना कमीत कमी 6 महीने वैधता असलेला प्लॅन घ्यावा लागेल.
जियो फायबरचे प्लॅन
रिलायन्स जियोने सादर केलेल्या 399 रुपयांच्या प्लॅनमध्ये 30एमबी, 699 रुपयांच्या प्लॅनमध्ये 100एमबी, 999 रुपयांचा प्लॅनमध्ये 150एमबी आणि 1499रुपयांच्या प्लॅनमध्ये 300एमबी अपलोड स्पीड मिळेल. विशेष म्हणजे या प्लॅन्समधील अपलोड आणि डाउनलोड स्पीड एकसारखा असेल. 1जीबीपीएस स्पीड असलेले प्लॅन देखील जियो फायबरवर उपलब्ध आहे.
रिलायन्स जियोच्या 999 रुपयांच्या पोस्टपेड जियोफायबर कनेक्शन सोबत ग्राहकांना ओटीटी अॅप्सचे सबस्क्रिप्शन मोफत मिळेल. अमेझॉन प्राइम, डिजनी हॉटस्टार, सोनी लिव, झी 5, वूट सिलेक्ट, सन नेक्स्ट इत्यादी 14 प्रसिद्ध ओटीटी अॅप्स जियो फायबरसोबत मिळतील. तर, 1499 रुपयांच्या प्लॅनमध्ये नेटफ्लिक्ससह 15 ओटीटी अॅप्सचा समावेश असेल. तसेच, या प्लॅनमध्ये 1000 रुपयांचे सिस्योरिटी डिपाजिट घेऊन ग्राहकांना एक 4K सेटटॉप बॉक्स मोफत देण्यात येईल.