Jio GigaFiber Plan: जिओ गिगाफायबरकडून 'ट्रिपल प्ले'ची टेस्टिंग सुरू, मिळणार जबरदस्त सुविधा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2019 04:12 PM2019-03-26T16:12:40+5:302019-03-26T16:13:43+5:30
रिलायन्सनं जिओ गिगाफायबर ( Jio GigaFiber) गेल्या वर्षी लाँच केलं.
नवी दिल्ली- रिलायन्सनं जिओ गिगाफायबर ( Jio GigaFiber) गेल्या वर्षी लाँच केलं. आतापर्यंत ही सुविधा मोजक्याच लोकांपर्यंत पोहोचली आहे. रिपोर्टनुसार, रिलायन्स कंपनी जिओ गिगाफायबरच्या लाँचिंगनंतर आता ट्रिपल प्ले प्लान(Triple Play Plan)चं टेस्टिंग करत आहे. ही सुविधा वापरणाऱ्यांना जिओ गिगाफायबर, जिओ होम टीव्ही आणि जिओ ऍप्सचं सिंगल पॅकेज महिन्याकाठी ठरावीक पैसे भरल्यानंतर मिळणार आहे.
जिओनं आतापर्यंत गिगाफायबरशी संबंधित प्लान जारी केलेले नाहीत. आतापर्यंत आपल्याकडे फक्त जिओ गिगाफायबरच्या आधीच्याच प्लानची माहिती आहे. टेलिकॉम टॉकच्या रिपोर्टनुसार, रिलायन्स जिओ ट्रिपल प्ले प्लानचं टेस्टिंग करत आहे. हा प्लान गिगाफायबर अकाऊंटच्या डॅशबोर्डवर पाहायला मिळणार आहे. आतापर्यंत फक्त सिंगल प्ले प्लानसंदर्भात माहिती होती. ज्याची मर्यादा 28 दिवसांसाठी आहे. या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि 100 जीबीपर्यंत डेटा एक्सेस, जिओ होम टीव्ही एक्सेस आणि जिओ ऍप्सचं मोफत सब्सक्रिप्शन मिळणार आहे.
परंतु जिओच्या या गिगाफायबर ट्रिपल प्ले प्लॉनच्या किमतीसंदर्भात अद्याप माहिती मिळालेली नाही. विशेष म्हणजे जिओच्या गिगाफायबर प्लॉनमध्ये जिओ होम टीव्हीच्या सुविधेचाही समावेश आहे. सद्यस्थितीत जिओ गिगाफायबर काही ठरावीक युजर्सचं वापरतात. ट्रिपल प्लानच्या टेस्टिंगनंतर जिओ होम टीव्हीची सेवाही जारी केली जाणार आहे.