Jio नं भरवली Instagram-Facebook ला धडकी! फक्त 10 सेकंदांचा VIDEO बनवा, होईल बम्पर कमाई!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2022 10:24 AM2022-11-29T10:24:03+5:302022-11-29T10:25:42+5:30

कंपनीचा फोकस युजर्सना उत्तम एक्सपेरिअन्स आणि क्रिएटिव्हिटीसह कमाई करण्याची संधी देणे असा आहे.

jio introduces platfom short video app and hit Instagram-Facebook Just make a 10 second VIDEO, make bumper earnings | Jio नं भरवली Instagram-Facebook ला धडकी! फक्त 10 सेकंदांचा VIDEO बनवा, होईल बम्पर कमाई!

Jio नं भरवली Instagram-Facebook ला धडकी! फक्त 10 सेकंदांचा VIDEO बनवा, होईल बम्पर कमाई!

Next


जिओ Meta च्या Reels फीचरला टक्कर देण्यासाठी लवकरच स्वतःचा शॉर्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्म लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. याचे नाव 'Platform' असे असणार आहे. या पद्धतीने फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या Reels चालतात, अगदी त्याच पद्धतीने हे अ‍ॅपही काम करेल. जिओने Rolling Stone India आणि Creativeland Asia सोबत पार्टनरशिप केली आहे. कंपनीचा फोकस युजर्सना उत्तम एक्सपेरिअन्स आणि क्रिएटिव्हिटीसह कमाई करण्याची संधी देणे असा आहे.

इंस्टाग्राम रील्स प्रमाणेच असेल - 
यासंदर्भात बोलताना Jio Platforms ने म्हटले आहे, की 'ऑरगॅनिक ग्रोथ आणि स्टेडी - मॉनिटायझेशनसाठी स्टार एंटरटेनर्सना फायदा होईल. हे सिंगर्स, म्यूझिशियन्स, अ‍ॅक्टर्स, कॉमेडियन्स, डान्सर्स, फॅशन डिझायनर्स आणि कल्चरला प्रभावित करणाऱ्या सर्वच लोकांसाठी सोशल होम आहे.' महत्वाचे म्हणजे, यासंदर्भात कंपनीने आतापर्यंत इंटरफेस आणि इतर डिटेल्सचा खुलासा केलेला नाही. मात्र, हे Instagram Reels प्रमाणे असण्याची शक्यता आहे. तसेच, हे युजर्सना उत्तम ग्रोथ आणि मॉनिटायझेशन ऑप्शन देण्यासाठी प्लॅन करत आहे.

कधीपर्यंत होणार लॉन्च? -
Jio Short Video Platform चे बीटा व्हर्जन उपलब्धा आहे आणि स्टेबल जानेवारी 2023 मध्ये लॉन्च केले जाईल. मात्र, ते लॉग इन करता येणार नाही. सर्वप्रथम 100 फाउंडिंग मेंबर्स इनव्हाइट सिस्टिमनेच अ‍ॅपचा करू शकतील आणि त्यांच्या प्रोफाइलवर गोल्ड टिक व्हेरिफिकेशनने त्यांची ओळख पटवली जाईल. जे युजर्स नवे मेंबर्स जोडण्यासाठी रिक्वेस्ट पाठवतील, ते रेफरल प्रोग्रॅमने लॉग इन करू शकतील. यानंतर त्यांना नवे फीचर्स दिली जातील, असे जिओने म्हटले आहे. तसेच, प्लॅटफॉर्म लवकरच व्हर्टिकलच्या क्रिएटर्ससाठी ओपन होईल, असेही कंपनीने म्हटले आहे. 

या अ‍ॅपच्या माध्यमाने क्रिएटर्स अधिक पैसा कमावू शकता. रँक आणि रेप्युटेशनच्या आधारे पैसे दिले जातील. क्रिएटर्सना त्यांच्या प्रोफाईलवर 'Book Now' बटन मिळेल, जे युजर्स, फॅन्स आणि ब्रँड्सच्या आर्टिस्टसोबत बोलण्याची परवानगी देईल. याच्या माध्यमाने, पार्टनरशिप, सर्व प्रकारचे गिग्स आणि इतरही काही गोष्टी बुक केल्या जाऊ शकतील.


 

Web Title: jio introduces platfom short video app and hit Instagram-Facebook Just make a 10 second VIDEO, make bumper earnings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.